गोंदियात आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

गोंदियात आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_धान्य विक्री करूनही पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याने जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात घेतला आत्महत्येचा निर्णय_

गोंदिया:-जिल्हा शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर रब्बी हंगामाचे धान्य विक्री करूनही पैसे न मिळाल्याने गोंदिया जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्या दालनात एका शेतकऱ्याने स्वतःच्या आंगावर पेट्रोल टाकून आज आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न केला .मात्र इतर शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हा अनुचित प्रकार थांबविण्यात आला मात्र तरी देखील जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे हे आपल्या खूर्चीवरून उठले नाही.

गोंदिया तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चुटिया गावातील श्रीराम अभिनव धान्य खरेदी संस्थेत चुटिया शह परिसरातील इतर काही गावातील शेतकऱ्यांनी जून महिन्यात धान्य विक्री केला होता . मात्र आज महिना लोटला असला तरी शेतक-यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. तर दुसरीकडे श्रीराम अभिनव धान्य खरेदी संस्थेकडे रब्बी हंगामात खरेदी केलेला धान्य गोदामात उपलब्ध नसल्याने जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला शेतक-याना दिला नाही .

त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अनेकदा जिल्हा पणन अधिकारी यांना पत्र व्यवहार केला मात्र आज पैसे जमा होतील उद्या पैसे जमा होतील चार दिवसात पैसे देतो असा टालमटोल शेतऱ्यांना सोबत केला जात असल्याने लोधीटोला गावातील दीपक कंसरे नामक शेतकऱ्याने स्वतःच्या ब्याग मध्ये आणलेला पेट्रोल अंगावर टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

*तुलाराम बघेले शेतकरी यांची प्रतिक्रिया*

एवढा मोठा कारभार होऊनही खुर्चीवर बसलेले जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे हे खुर्चीवरून उठले नाही तर दुरीकडे सोबत आलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे मोठा अनर्थ संपुष्टात आला. तर दुसरीकडे श्रीराम अभिनव धान्य खरेदी संस्स्थेने खरेदी केलेला धान्य चार दिवसात आपली संपत्ती विक्री करून जिल्हा पणन कार्यालयाला धान्य उपलब्ध करून देत असल्याचे लेटर हेड वर लिहून दिले . त्यामुळे येत्या चार दिवसात पैसे मिळाले नाही तर आणखी मोठा आंदोलन करू असा इशारा शेतक-यांनी जिल्हा पणन अधिका-यांना दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles