वर्धा जिल्हास्तरीय मेळावा व सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व गुणगौरव सोहळा आज

वर्धा जिल्हास्तरीय मेळावा व सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व गुणगौरव सोहळा आज



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कास्ट्राईब शिक्षक संघटना वर्धा जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांची निवड व सत्कार

वर्धा: कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा वर्धाच्या वतीने जिल्हा स्तरीय मेळावा व सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व गुणगौरव सोहळा, तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना वर्धा जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांची निवड व सत्कार आज दि २९ जुलै २०२३ रोजी चेतना डी. एड. कॉलेज देवळी रोड वर्धा येथे सकाळी ठीक 11 वा आयोजित करण्यात आला आहे.

आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्याचे उदघाटक डॉ प्रोफेसर मिलिंद सवाई, प्राचार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल वर्क वर्धा हे राहणार असून मुख्य मार्गदर्शक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी डी धुरंधर असतील; तर प्रमुख पाहुणे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, मुख्य संघटक परशराम गोंडाणे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील, वर्धा पं सं चे सहाय्य्क लेखाधिकारी आशीष दहिवाडे, केंद्रप्रमुख आर्वीचे चरनदासजीं चारभे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी वर्धा जि. प. वर्धाचे शिक्षणविस्तार अधिकारी धनराज तायडे नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते होणार आहे. तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना वर्धा जिल्हा शाखेच्या नवीन कार्यकारणीच्या सदस्य व पदाधिका-यांची निवडही करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्म. महासंघाचे राज्य पदाधिकारी रमेश वानखेडे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष आम्रपाल कांबळे, कोषाध्यक्ष सुधीर मुरार, माजी अध्यक्ष राजु थुल आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला कास्ट्राईबच्या सर्व शिलेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कास्ट्राईब परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles