‘वीरांच्या कर्तृत्वाची शौर्यगाथा सांगणारा हाच तो स्मारक’; प्रा तारका रूखमोडे

‘वीरांच्या कर्तृत्वाची शौर्यगाथा सांगणारा हाच तो स्मारक’; प्रा तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण

‘बाळा युद्धात तू जखमी झालेला. कालचा थरार ऐकून जीवात जीव नाही माझ्या..मी येतेय भेटायला..!’ नको गं..काही नाही झालेलं मला..फक्त डोक्याची कवठी थोडीशी फुटलेली..पोटाला गोळी लागल्याने आतडी थोडीशी तुटलेली त्यामुळे छोटसं ऑपरेशन पोटाचं फक्त..डावा हात मोडल्याने प्लास्टर मध्ये आहे फक्त.. सुरंगातील गोळ्यावर पाय ठेवला म्हणून माझा डावा पाय माझ्यासमोरच हवेत उडून गेला.तोंडातून थोडसं रक्त येतंय फक्त..फक्त एवढंच.पण मी सुरक्षित आहे. काळजी करू नकोस, तुला बरं नाही ना आराम कर..! मला भेटण्यापेक्षा माझ्या साथीदारासाठी प्रार्थना कर,त्याने या युद्धात माझ्यासमक्षच दोन्ही डोळे व हात गमावलेत गं..असं म्हणून त्याने फोन ठेवला. पुढच्या पाच-सहा महिन्यांनी अगदी बाईकवरून उतरून चालत मावशीच्या दारात भेटायला आलेला वीर कॅप्टन शौर्य…
मोठमोठ्या जखमांना ‘फक्त’ या एका शब्दात लपेटून मातृभूमीपुढे स्वतःच्या वेदना अगदी नगण्य मांनणाऱ्या वीरांना खरंच कुठल्या शब्दात बांधावं..?

हाच नव्हे तर अशा अनेक वीरांचे प्रसंग अगदी शब्दातीतच..प्रत्यक्ष मृत्यू समोर असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूला आव्हान देणारे हे वीर कॅप्टन.. कोणी दिल मांगे मोअर म्हणत..तर कोणी जय हिंद म्हणत.. तर कोणी भारताचा विजयी ध्वज रोवूनच परत येईन.. नाहीतर त्यात लपेटून येईल.असे म्हणत. कुणी शत्रूची दिशाभूल करत तर कोणी निधड्या छातीवर प्रहार झेलत जिद्दी मनोबलावर व अदम्य साहसावर अतीदुर्गम भागातील बर्फाच्छादित शिखरावर शत्रूच्या जीवघेण्या तोफा आग ओकत असतानाही पायदळ लष्कराने कारगिलच्या ‘ऑपरेशन विजय’ची विजयश्री खेचून आणलेली…

होय..हा सगळा थरार तेव्हाचा, जेव्हा पाकिस्तानने घुसखोरी करून कारगिल मधील अतीदुर्गम भागातील सैनिकांना जी रसद पाठविली जाते ती लाईफलाईन कट करण्याचा
षडयंत्र रचला होता, त्याला आमच्या शूर वीरांनी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती देऊन हा कट उधळलेला..याच विजयश्रीसाठी अगदी प्रतिकूलतेतही ज्या शहिदांचं रक्त या भूमीवर सांडलं, तीच ही तोलोलिंगची त्या रक्तांनं पावन झालेली वीरभूमी.उच्च मनोबल, निस्वार्थ बलिदान,समर्पण,असामान्य कर्तृत्व,प्रखर राष्ट्रनिष्ठा, या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारा व त्यागाचा इतिहास व वीरांच्या कर्तृत्वाची शौर्यगाथा सांगणारा हा स्मारक.. या शहिदांना सलाम करताना अभिमानाने तथा ऊर्जेने मन भरून येते, व नकळत कर या दिव्यत्वापुढे जोडले जातात.ह्याच भावार्थाचं हे आजचं चित्र किती बोलकं व हृदयस्पर्शी..

विजय स्तंभ
हुतात्मा स्मरण
करू वंदन

कितीही मोठे तंत्रज्ञान विकसित झाले,तरीही युद्ध जिंकले जाते ते सैनिकांच्या कौशल्य जोरावरच. शस्त्रांपेक्षा तो शस्त्र चालवणारा वीर महत्त्वाचा. असीम आकाशापासून तर अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाच्या ठसा उमटवणारा सैनिक देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून 36..36 तास बर्फाच्या वादळात उभा पहारा देतो,म्हणूनच आपण सुखाची निद्रा घेतो.

कारगिलच्या वीरश्रीच्या इतिहासाची प्रेरणा काव्यज्योत बनून शिलेदारांच्या लेखणीत अमर व्हावी व ती सर्वसामान्यांपर्यंत पोचून त्यांच्यातही वीरश्री निर्माण व्हावी व त्यावरील कवणे लेखणीतून उतरावीत या भावनेने कदाचित आ. सरांनी हे चित्र दिलेलं..🙏 परीक्षणार्थ रचना वाचताना प्रखर देशभक्ती प्रत्येकाच्या रचनेतून जाणवली, तेव्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन 💐असेच लिहिते व्हा.. आ. राहुल सर आपण मला हायकूकाव्य परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल आपले हृदयस्त आभार..🙏

प्रा तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles