शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ताबूत*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लग्न झाले आहे रे माझे
मी तुला परकीच ना रे आता
खूप छान चाललेय माझे जीवन
नाही मुळीच मी मारत बाता….

तू होतास माझा प्रियकर
पण तू आईबाबांना घाबरला
मागणे आले मला छानसे मग
पतीदेवांचा हात घट्ट धरला….

पंचवीस वर्षाने अचानक भेटलास
कशाला तू मला रे सामोरी आलास
परत मी पंचवीस वर्ष मागे गेले
आठवणींचा सुगंध तू पसरवलास…

आठवणींच्या वेलीवर जरा बहरले
पण समोर होती जबाबदारी कुटुंबाची
स्वजीवन जगणे शक्य नाही समजवले
काळजी घ्यावीच लागणार मुलांची….

आपण आता परत नको भेटायला
मी समजावेन माझ्या मनाला
कुटुंबापुढे काहीच नाही स्वतःचे उरले
शव जाईन माझे ताबूत तेंव्हा ये मयतीला….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

देशसेवेचे स्वप्न उराशी
जीवापाड केली मेहनत
साध्य करण्या हेतू चाले
योग्य दिशेने जीवन घडवत

स्वातंत्र्याचा इतिहास वाचता
रक्त सळसळे अंतःकरणी
व्यर्थ न बलीदान वीरांचे
पायधूळ लावून चरणी

आकाश ठेंगणे झाले जेंव्हा
गेला वीर तो सीमेवरती
मातृभूमीचे रक्षण करण्या
अभिमानाने फुलली छाती

द्वंद्व सुरू ते कारगीलचे
काळाने कशी वेळ गाठली
लढला वीर त्वेषाने माझा
गनिमाने बेछूट गोळी झाडली

वंदे मातरम् घोष मुखातून
पडला धारातीर्थी रणमैदानी
शहीद सुपूत्र ताबूतामध्ये
अमर रहे जयघोष कानी.

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

मन काबूत आहे तोवर इंद्रिये साबुत आहे
मन उडले वाऱ्यावर तर अल्पायुषी शव ताबूत आहे

ते राहतील सोबतीने जोवर आहे पैसा
हा खेळ सारा खिशातील ढबूत आहे

लफंग्याचा जमेल गोतावळा गुड तिथे माशा
म्हणतील आम्हासाठी धावून आलेला हा देवदूत आहे

लागेल त्यांच्यात स्पर्धा तुझी बढ़ाई करण्यासाठी
म्हणतील हा माझा मित्र खूप अद्भुत आहे

ताबूत जायची वेळ येईल मग ओळखशील त्यांना
म्हणशील तू स्वतः मित्र सारे बसलेले मानगुटीवरील भूत आहे

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*ताबूत*

मोहरम सणाला
ताबूत बसविती
शेवटच्या दिवशी
काही दफन करती ||१||

आपापल्या परीने
प्रतिकृती बनविती
मौल्यवान असता
वर्षानुवर्षे ठेवती ||२||

रोशणाई करूनी
सुशोभित करती
लढाईचे वर्णन
मज्लिस वाचती ||३||

सकाळ संध्याकाळ
सारे शोक करती
हौतात्म्याप्रीत्यर्थ
डोळे पाण्याने भरती ||४||

शेवटच्या दिवशी
मिरवणूक निघती
दु:खी मनी बांधव
सारे गांभीर्य राखती ||५||

हौतात्म्याप्रसंगाचे
वर्णन करत चालती
कब्रस्तानात नेऊनी
ताबूत दफन करती ||६||

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

ऊन वारा पावसातही
तैनात सैनिक सीमेवर
देशसेवेचे व्रत घेऊनी
नजर ठेवतोय शत्रूवर

सुरक्षित असतो सारेच
गाढ निद्रेमध्ये झोपलेले
खडा पहारा चालू असे
डोळयात तेल घातलेले

भीती न तया संकटाची
पर्वा न करती जिवाची
शत्रुसवे लढतालढतांना
बाजी लावती प्राणाची

विरमरण पत्करतील ते
परी माघार नाही घेणार
देशहिताच्या रक्षणास्तव
प्राणाची आहुती देणार

तिरंग्यात लपेटून शव ते
ताबूत येता सैनिका घरी
टाहो फोडूनी आक्रोशती
अबालवृद्ध जनता सारी

अमर रहे जयघोष करत
श्रद्धांजली अर्पण करून
सलामी देती जनता तया
आदरांजली वाहे स्मरून

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

आज शव वाहतांना, मन विषण्ण झाले..
भावनांना माझ्याही, आज पूर आले…

तिरंग्यात लपटलेला, शहीद देह,
येताच आत माझ्या, मन चेतन झाले..

बिलगताच मला, शवाचे आप्त
मन माझेही, गहिवरून आले..

हंबरडा फोडून, मूर्च्छित झाली माय
बापाच्या काळजाचे, तुकडे चार झाले..

निःशब्द भार्या, ऊभी कोपऱ्यात
निस्तेज नयनात, पाणी दाटून आले..

पाहता सभोवार, अफाट जनसागर
चिमुकल्या नजरेत, भाव अबोल झाले..

होय, ताबूतच मी, शव वाहिने काम माझे
पण, पाहता जन आक्रोश, काळीज फाटून गेले..

*सौ वनिता गभने*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩🎗️🚩➿➿➿➿
*ताबूत*

सीमेवर लढता लढता
जातो प्राण जवानांचे
माहितच नसतो त्यांना
ह्या अमोल जीवनाचे

एकटाच असतो मायबापाला
आस असतो त्याच्यावर
अन् गर्वाने सांगतात लोकांना
माझा मुलगा गेला सीमेवर

भाऊबहिणीची माया मोठी
जीव ओवाळतात त्याच्यावर
भाऊ माझा येईल दिवाळीला
वाट पाहत बसतात दारावर

दहशत वाद्यांच्या गोळीला
शहीद होतो तो जवान
तो भारत मातेचा सुपुत्र
देशाच्या रक्षणा गमावतो प्राण

जेव्हा त्यांचे पार्थिव शरिर
सजलेल्या ताबूत येतो भरून
शहीद जवान अमर रहे चा नारा
सारे लोक म्हणतात जमून हृदयातून

आई बापाचे अश्रू न थांबता
वाहतो अश्रूंचा महापूर
कुरवाळून त्यांच्या ताबूताला
कां गेलास सोडून आम्हा दूर

ही किती विदारक स्थिती
पसरतो शोककळा गावावर
सारेच असतात स्तब्ध
आम्हा गर्व आहे त्यांच्या शौर्यावर

हे वीर जवान महान
आहेत देशाची शान
चला करू अभिवादन जवानांना
आहे आम्हाला त्यांचा अभिमान

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles