त्याग,बलिदानाचं प्रतीक ताबूत….!

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿

*✍️परीक्षणाच्या निमित्ताने…*

➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿

*त्याग, बलिदानाचं प्रतीक ताबूत….!*

*ताबूत अर्थात शवपेटी… शेवटच्या विसाव्याला जाताना मृत व्यक्तीला वाहून न्यायचे एक साधन. साधारणतः मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव याचा उपयोग करतात हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे. मात्र मराठीचे शिलेदार समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य प्रशासक माननीय राहुलदादा पाटील यांनी ‘ताबूत’ हा विषय दिला तो बहुतेक ‘मोहरम’ या सणाच्या पार्श्वभूमीवर.*

*काय आहे या मोहरम सणाची पार्श्वभूमी आणि का बरं मिरवणूक काढली जाते या ताबूतांची ? हिजरी कालगणनेनुसार ‘मोहरम’ हा इस्लामिक दिनदर्शिकेतील पहिला महिना. हा महिना आनंदाचा नसून दुःखाचा आहे असे मुस्लिम बांधव मानतात. कारण याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू म्हणजेच मुलगी बीबी फातिमा हिची मुले हसन आणि हुसेन हे बगदादमधील ऐतिहासिक करबला युद्धात शहीद झाले. खलिफा यजिदच्या सैन्याने या भावंडांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हाल हाल करून मारले. या कटू घटनेचे दुःख व्यक्त करण्यासाठी ‘मोहरम’ हा सण साजरा केला जातो.*

*आपल्या भारत देशात सर्वच सण आनंदाने, उत्साहाने आणि श्रद्धेने साजरे केले जातात. तशाच प्रकारे ‘मोहरम’ हा सण देखील तितक्याच श्रद्धेने साजरा केला जातो. या सणात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून येते. धार्मिक स्थळी चंद्रदर्शनापासून हसन आणि हुसेन यांच्या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून सवाऱ्या आणि ताबूत सजविले जातात. मोहरमच्या दिवशी मिरवणूक काढून त्यांना विसर्जित केले जाते. हा ताबूत ताजिया, डोला या नावाने पण ओळखला जातो. खिचडा आणि मलिंदा अर्थात मिश्र धान्यांची खिचडी व पोळ्यांच्या चुर्म्यापासून बनवलेला गोड पदार्थ मलिंदा या दिवशी विशेषकरून खाल्ला जातो. आमच्या लहानपणी शेजारच्या मुस्लिम मैत्रिणीकडे ‘चोंगे’ नावाचा गोड पदार्थ देखील केला जायचा ज्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.*

*तर अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मोहरम सणाचे आणि ताबूताचे महत्त्व वर्षानुवर्षे अबाधित आहे. आपल्या मराठीचे शिलेदार समूहातील काही बंधुभगिनींनी मोहरम सणाला सामोरे ठेवून कविता आणि चारोळी रचल्या आहेत आणि त्या माहितीपूर्ण आहेत. त्याचबरोबर भारतभूमीसाठी प्राणांचे बलिदान केलेल्या वीर जवानांना ताबूतात कशाप्रकारे सन्मानाने आणले जाते आणि त्यावेळी कुटुंबातील आईवडील,पत्नी, मुले यांच्या मनातील दुःखाचा सागर सर्वांनीच ह्रदयस्पर्शीरित्या शब्दांकित केलेला आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि त्याग बलिदानाच्या ताबूताला अभिवादन….!*🙏

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔖🌸🔖♾️♾️♾️♾️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles