“मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे कास्ट्राईब”

“मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे कास्ट्राईब”पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हास्तरीय मेळावा व गुणगौरव कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

बुलडाणा: कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा बुलडाणाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हा मेळाव्याचे छत्रपती राजर्षी शाहु महाराज सभागृह ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र बुलढाणा येथे दि.30 जुलै 2023 रोजी नविन शैक्षणिक वर्षात भव्य आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज , क्रांतीसूर्य महात्मा फुले ,भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी माल्यार्पण करून करण्यात आली. प्रमुख मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन कास्ट्राईब तालुकाध्यक्ष यांचे वतीने स्वागत करण्यात आले. तदनंतर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सेवानिवृत्त झालेल्या शिलेदारांचे विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या पाल्यांचा गुणगौरव सत्कार शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे बी.डी.धुरंधर राज्य कार्याध्यक्ष ,परशराम गोंडाणे राज्यमुख्य संघटन सचिव,सतीश कांबळे राज्य सरचिटणीस , दिलीप खंडारे राज्य सदस्य, सुभाष डोंगरदिवे राज्य अतिरिक्त सरचिटणीस, अरूण सावंग विभागीय अध्यक्ष अमरावती यांचे मार्गदर्शनात तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते संजय वानखेडे, एन.डी इंगळे व पी.ए.मोरे उपस्थित होते.

बी.डी.धुरधर यांनी संघटनेला उंच भरारी देण्याबाबत तद्वतच संघटना वाढीसाठी तन,मन, धनाने सहकार्य करण्याचे मार्गदर्शन केले.सातिश कांबळे सरांनी आंबेडकरी चळवळ जीवंत राहण्यास्तव संघटनेच्या माध्यमातून काम केलं पाहीजे. आपण ज्या समाजातून आलो त्याचं काही देण लागतय याची जाण ठेवावी असे विचार व्यक्त केले.

परशराम गोंडाणे यांनी बुलढाणा जिल्ह्याची कास्ट्राईब संघटना उभारणीत महत्वाचा वाटा आहे तो जतन करावा असे सांगितले . शेषराव वाकोडे जिल्हाध्यक्ष यांनी वेळेचे महत्व ओळखून कार्य करावे संघटना ही माझ्यामुळे नसून सर्वांच्या सहकार्याने आहे असे समजून समस्यांवर मात करावी असे मत अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

सभेसाठी प्रमुख उपस्थिती आय.टी इंगळे माजी जिल्हाध्यक्ष जि.प.कर्मचारी जि.प.कर्मचारी. अशोक हिवाळे जिल्हाध्यक्ष आय.टी.आय. आदींची होती. सभेमध्ये नुतन खामगाव तालुकाध्यक्ष म्हणून साहेबराव सोळंके यांना नियुक्ती पत्र देवून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून सर्व जिल्हा पदाधिकारी ,आजी- माजी तालुकाध्यक्ष ,सचिव व सदस्य बहुसंख्येने उपस्थीत होते.

प्रास्तविक जिल्हा सरचिटणीस प्रदिप इंगळे यांनी केले तर बहारदार सुत्रसंचालन भारत अंभोरे व विजय बावस्कर यांनी तर आभार प्रदर्शन संदिप वानखडे जिल्हा सोशलमिडिया प्रमूख यांनी केले.भोजनानंतर मेळाव्याची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश वाघ , विनोद चव्हाण, अनिल दाभाडे, विजय बावस्कर, कमलाकर डोंगरे, अभिनंदन इंगळे, भगवान मोरे, हरी वानरे, सुनील गवई,यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles