गुंतवणूक..

गुंतवणूकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘गुंतता हृदय हे….!’. कुठेतरी वाचलं त्यातून बाहेर आले…. अरे ही तर ‘भावनिक गुंतवणूक..! गुंतवणूक शब्दच मुळी गुंतागुंतीचा असं समजायला लागलं तस बचत हा शब्द कानावर नेहमीचा पडा यचा… थोडं मोठं झाल्यावर हा शब्द जणू पाठीमागेच लागला.. घरात आई पासून तर शाळेत…. दुकानात…. कुठेही जा…. या शब्दाभोवतीच्या वर्तुळातून बाहेर पडता यायचच नाही. तसेच आधी ‘इन्व्हेस्ट’ आणि नंतर ‘इन्व्हेस्टमेंट’ नंतर आजतागायत या शब्दाने पिच्छाच पुरवला. नुकतेच मुलाला नोकरी लागली. आता काही दिवसात त्याचा पहिला पगार मिळणार याची जाणिव झाली. आणि मग पुन्हा गुंतवणूक हा शब्द मनाचा, डोक्यातील विचारांचा गुंता वाढवू लागला. तिकडे त्याच्या ऑफिसमध्ये ही त्याला एक ‘इन्वेस्टमेंट एजंट’ भेटले. आणि मग तुम्हाला कळलं असेलच… ते काय सांगणार ते..!

ते त्याला म्हणाले, “. साहेब तुम्हाला आयुष्यात बचत करायचे असेल तर ती आत्तापासून केली पाहिजे आता तुमचे लग्न होणार… पुढे मुलं होणार. तेव्हा मला आता हे सांगा, तुम्हाला आता हातात किती पगार मिळणार? असेच अनेक प्रश्न! तो तर संभ्रमात पडला. शेवटी हा ससेमिरा थांबवण्याच्या साठी तो म्हणाला, ” मम्मी पप्पांना विचारून सांगतो”.. ( अर्थात लग्न झालेलं नसल्यामुळे).. नाहीतर…….. आणि संध्याकाळी घरी आल्यावर त्याने पुन्हा मला या विषयावर सांगितलं… आणि पुढचा निर्णय आमच्यावर सोपवला. पण तत्पूर्वी तो माझ्याशी जे बोलला त्याने मात्र मी स्तब्ध झाले तो म्हणाला, ‘मम्मी अगं गुंतवणूक करायची कुणासाठी….. बायको… मुलांसाठीच… ना! पण अजून माझ्या आयुष्यात ही नातीच नाहीत. मग गुंतवणूक कशासाठी करायची? अगोदर नातं…. ‘नात्यात गुंतवणूक होऊ दे’ मग ‘मनाची गुंतवणूक’ आणि मग ‘पैशाची गुंतवणूक.’ ओह… ! किती आगळा वेगळा विचार हा… आता माझेही विचार बदलले.. पुन्हा ‘गुंतवणूक ‘या विषयाचा विचार केला. आणि मग जरा खोलात गेले… कारण मनुष्य प्राणी हा गुंतवणुकी बाबत नेहमीच हळवा असतो. आणि मग वाटलं, अरे हा म्हणतो ते बरोबरच आहे.

आयुष्यात जर सुख मिळवायचं असेल तर, मुलं झाल्यावर पहिल्यांदा त्यांच्यात जीवाची गुंतवणूक करताना इतरही पॉलिसी ओपन करायला हव्यात. ‘मनाची मनाशी गुंतवणूक मग् नात्यांची गुंतवणूक आणि मग भावनांची गुंतवणूक’ त्याचबरोबर त्याला ‘ज्ञानातही गुंतवणूक’ करायला शिकवायला हवं. तरच आयुष्याच्या गरजेच्या वळणावर मिळणारा बोनस आणि व्याज आपली श्रीमंती वाढवू शकतो.

अनिता व्यवहारे.
ता श्रीरामपूर जि.अहमदनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles