मनाची अवस्था तुटते तेव्हा..!

मनाची अवस्था तुटते तेव्हा..!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ असते ती मनाची व मनातील विचारांची ; विचार हे आजुबाजुच्या वातावरणात घडणाऱ्या घटनामुळे किंवा संगतीमुळे घडतात. पण हा बाह्य परिणाम हे बाहेरील जगाशी संबधीत आहे. परंतु अंतरंगातील दुनिया अमर्याद आहे ते अंतर आत्म्याशी निगडीत आहे. बाह्यरंगामुळे आपली अंतरंगातील ताकद ओळखु शकत नाही. त्याच कारण म्हणजे आपण स्वःताच्या परत्म्याशी संवाद करत नाही . बाह्य दुनियेत कसं होणार , कोण काय म्हणेल, या विचाराने भुतकाळ , भविष्यकाळ चिंतेच्या ओझ्याने अंतरंग दबावाखाली येते. त्यामुळे ज्याला आत्मविश्वास म्हणतो तो म्हणजे आतील अमर्याद शक्ती नाहीशी होते.

स्वार्थी विचाराने नाही परंतु अमर्याद शक्तीने वाटणारी भिती , शंका कुशंका , वाईट विचारांचं चालणार राज्य हे सकारात्मकतेने या सर्वावर मात नक्कीच होते.
‘स’ म्हणजे सकार आत्मक जो प्रवास संकल्प ते सिद्धीपर्यत पोहचणं हा जमणं म्हणजे सिद्धीतुन प्रसिद्धीस येणे होय. संत म्हणजेच सकारत्मक विचारांचा कधीही अंत होत नाही . त्या सदृढ विचारांची संगती म्हणजेच संतसंगती होय. म्हणूनच स्वःताचा संवाद स्वः शी असणे महत्वाचे वाटते. .
अध्यात्म ह्या शब्दात अध्ययन करायचं ते आत्म म्हणजे आतील उर्जाशक्तीशी जी नाशवंत नाही.

खुप गुढ अध्यात्म देते. त्यात स्वःताचा संवाद हा meditation इंग्लीश शब्द लोकांना समजतो पण ते समाधी अवस्था हेच तर आहे सम म्हणजे balance करणं equality ठेवणं. सुःख दुःख सर्व परिस्थितीत स्थीरता आणणं हेच समाधी अवस्थेने साधता येते व स्वःताशी संवाद होते. tension आल्यानंतर कमी जास्त म्हणजे ओढाताण आणि तणाव होण तेच तर जास्त झाल तर तुटत तेही मनाच्या अवस्थेत तुटणं म्हणजे depression येणं होय.
म्हणुन मजबुत होण्यासाठी relax म्हणजे निवृत्ती होय.

लेखनीची करामत विचाराची मशागत

विचारांची नाळ तुझी सत्मार्गावर चालू दे
सूड भावना मनातील विसरून जाऊ दे

हा देह नसे कुणाच्या अत्याचाराचा धनी
परोपकारी भावना असू द्यावी मनी

उलघाल तुझ्या मनाची होऊ दे कमी
संत संगतीने परिवर्तन होईल तुझ्या मनी

करून विचार निटनेटका
अहंकाराला दूर फेका

सोड तुझा मीपणाचा हेका ;
माणूस म्हणून जगायला शिका

मनिषा सुतार
पिंपरी चिंचवड, पुणे
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles