स्री जन्मा तुझी कहाणी..!

स्त्री जन्मा तुझी कहाणी….!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्त्रीची अनेक रूपे आहेत.आई पत्नी, मुलगी, बहिण. मैत्रीण हे सर्वांना तर हवी आहे. तर स्त्री ही विश्वाची जननी मानली जाते. आज पूर्ण विश्वाला व्यापून राहिलेली स्त्री. आध्यात्माने स्त्रीला दिलेले अनन्यसाधारण महत्त्व स्त्री म्हणजे ईश्वर व आत्मा यांचे मिलन. विश्वनिर्मिती हे सुद्धा स्त्री अबला ! पण आज स्त्रीच्या बाबतीत मागे वळून पाहिले तर तिची शोकांतिका समोर येते. महाभारताच्या काळापासून आजपर्यंत स्त्रीच्या स्वार्थासाठी वापर केला गेला. तिच्याकडून प्रचंड अपेक्षा केल्या गेल्या. आज अनेक स्त्रिया आहेत ज्या अनिच्छेने जगतात. इतकेच नव्हे तर स्त्री सहनशील आहे म्हणून अनेकांच्या संसार शाबूत आहेत नाही तर पाश्चात पद्धतीने सकाळी लग्न तर संध्याकाळी घटस्फोट झाला असता पण आज गरज आहे स्त्री जागृतीची. डोळसपणे जगण्याची. आपले अस्तित्व. शोधण्याची प्रथम स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाचा आभिमान बाळगला पाहिजे. मुलगी जन्माला येण्यापासून रोखू नये. त्यामुळे समाज संतुलन राहिलच. स्त्रीला समाजात वावरणे सहज व सुरक्षित होईल.

प्रचलित समजाणे स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले. पण सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाने शिक्षणाची दारे खुली झाली समाजात प्रत्येक क्षेत्रात स्वतः ला पूर्ण पणे झोकून देणाऱ्या स्त्रीच्या प्रगती दिवसेंदिवस गतिमान होऊन देशाच्या प्रमुख पदावर स्त्री विराजमान झाली. स्त्री मुक्ती म्हणजे काय ? हे प्रथम जाणावे. पॅन्ट-शर्ट घालून अवेळी घराबाहेर पडणे किंवा घरी येणे. म्हणजे स्त्रीमुक्ती नव्हे. शिक्षणाच्या नावाखाली गैर मार्गाने जाणे,आधुनिकतेच्या नावाखाली जुन्या वयस्क व्यक्तींचाअपमान करून कुटुंब स्वास्थ्य ,प्रेम बिघडवून पार्टी सभा करणे म्हणजे स्त्रीमुक्ती नव्हे. स्त्री मुक्ती म्हणजे नवीन विचार.आदर्श जोपासून पुढे जाणे. शिक्षणा बरोबर विनय, संस्कार व संस्कृती यांची जोपासना करून अंधश्रद्धा झुगारून नवीन विचार स्विकारणे म्हणजे स्त्री मुक्ती समजतात.

आजची स्त्री सक्षम बनली पाहिजे. शिक्षणाबरोबर नवीन विचारधारा धरून स्त्रीने मनाने व शरीराने सुदृढ होणे आवश्यक आहे. कारण हे राज्य आहे अधर्माचे. आज रिंकू पाटीलची पुनरावृत्ती होता कामा नये, यासाठी गरज आहे… शिक्षणाची विज्ञानाची, तंत्रज्ञानाची, कास धरून उत्तरोत्तर प्रगती करणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हा राबण्याचे राज्य होईल. तिथे असेल फक्त पैशासाठी , सत्तेसाठी व्याभिचार, अत्याचार शोषण या सर्वात स्त्री भरडली जाईल. परिणाम स्वरूप मुलगा भविष्यात आई-वडिलांचे प्राण घेण्यास मागे – पुढे पाहत नाही, तेव्हा मुलांना दोष देऊ नका. कारण..

‘मूल म्हणजे मातीचा गोळा
आकार द्यावा तशी मूर्ती घडते’ ‘

आज स्त्रीवर फार मोठी जबाबदारी आहे. उद्याच्या आदर्श समाज घडवून समाजाचा ऱ्हास थांबविणे तिच्या हाती आहे. एड्स सारख्या भयावह रोमाने आज थैमान घातले आहे. मुलींने डोळसपणे समाजाकडे व जीवनाकडे पाहावे. खोट्या सुखाच्या कल्पनेत रममाण होण्यापेक्षा वास्तवाचे भावात ठेवून यशस्वी जगावे. लग्नाच्या वेळी पत्रिका, घराणे, संबंध पाहण्यापेक्षा मुलाचे कर्तृत्व , नितीमत्ता , वैद्यकीय तपासणी यावर भर दाखवा आंधळेपणाने प्रेम न करता डोळसपणे जीवन सवंगडी शोधावा. तरच जीवन यशस्वी होईल.

वर्षा मोटे पंडीत
छ. संभाजीनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles