किल्ले जंजिरा..

किल्ले जंजिरापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रायगड जिल्ह्यातील मुरूडच्या किनारपट्टीजवळील शहरानजीक एका बेटावर वसलेला किल्ला म्हणजेच मुरूड-जंजिरा. सोळाव्या शतकाच्या अखेरीस बांधलेला हा किल्ला आजही जवळजवळ पूर्णपणे अबाधित आहे. जंजिरा हा भारतातील सर्वात मजबूत सागरी किल्ल्यापैकी एक मानला जातो. सध्याचे बांधकाम आहे ते अहमदनगरच्या निजामाच्या परवानगीने बु-हाणखानाने बांधलेले आहे. इ.स. १६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त कली. शिवाजीमहाराजांच्या काळात कोंडाजी फर्जंद यांनी हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु फितुरीमुळे ते पकडले गेले. १७३६ मध्ये चिमाजी आप्पा यांनी रेवसजवळ जमा झालेल्या सिद्दीच्या सैन्य छावणीवर हल्ला केला. येथील सिद्दी सरदारांनी हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य ठेवला. ३ एप्रिल १९४८ मध्ये हे राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.

किल्ल्याची भिंत सुमारे ४० फूट उंच असून त्यात १९ गोलाकार कमानी आहेत. किल्ल्याला अजूनही सुस्थितीत असलेले २६ गोलाकार बुरुज आहेत. बुरूजावर देशी व युरोपियन बनावटीच्या ५७२ तोफा होत्या. यामध्ये आगीचा कल्लोळ व धातूच्या बांगड्यांनी तयार केलेली कलाल बांगडी तोफ आहे. ती उन्हातही गरम होत नाही. तिचे वजन २१ ते २२ टन आहे. कलाल बांगडीच्या पुढे गायीसारखे तोंड असलेली गायमुख तोफ आहे. तिचे वजन ८ टन आहे. गडाच्या पश्चिमेला तटाखाली दर्या दरवाजा आहे. याचा वापर संकटकाळात केला जात असे. समुद्राखाली ५०-६० फूट खोल एक भुयारी मार्ग आहे तो राजापुरी गावात जातो. किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा वाडा अवशेष रूपात आहे. ६० फूट खोल गोड्या पाण्याचा शाही तलाव आहे. तलावाच्या बाजूने पाय-या आहेत त्यावरून गेल्यावर बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आता भारताचा झेंडा फडकतो. किल्ल्यावर वाघाच्या पंजात हत्ती पकडले आहेत अशी शिल्पे आहेत. ती अमर्याद सागरी सत्तेचे प्रतिक दर्शवतात.
किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई किंवा पुणे येथून अलिबाग येथे जावे लागते. येथून हा किल्ला ५४ किमी अंतरावर आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीने जावे लागते. ह्या बोटी मंजिरी, श्रीवर्धन, दिघी, दिवेआगर, राजापुरी गाव बेट या पाच ठिकाणाहून आहेत. राजापूर गावापासून जंजिरा अंतर केवळ पाच सहा किलोमीटर असल्याने लवकर पोहचता येते. या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला फक्त ४५ मिनिटे मिळतात त्यामुळे याची ऐतिहासिक माहिती आधीच माहीत करून घेतल्यास सोयीस्कर होऊन किल्ला पाहणे फायद्याचे ठरते.

स्वाती मराडे, इंदापूर पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles