संंबंध..

संबंधपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

द्यायचेच झाले तर, थोडे देईन तुला हसू
घ्यायचेच झाले तर, तुझे घेईन मी आसू.. //

जाऊन पोहचलोय दूर, मैत्रीच्या पलिकडे
येऊन ठेपलोय समीप, प्रेमाच्या अलिकडे.. //

नसेल काही अजूनही, नात्याला या नाव
कळलेत परस्परांना, ह्रदयातील या भाव.. //

जाणवतय मला तू, काळजातून जपतेस
दुःखावू नये मन,म्हणूनही काळजी घेतेस.. //

तुझी माझी भेट, फक्त योगायोग नसावेत
वाटते गत जन्माचे, अतुट संबंध असावेत.. //

तुला पोहचता झळ, जाणवते मला कळ
सांग का उंचबळतोय, मनाचा खोल तळ… //

माझ्या हरेक प्रश्नाचे, तूच व्हावीस उत्तर
दरवळावे श्वासात , तुझ्या प्रितीचे अत्तर…//

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
===========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles