आम्ही शाळकरी मुलं..

आम्ही शाळेकरी मुलं



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शाळेतील संस्कार जोपासूया
जीवनाची यशस्विता जाणूया
आम्ही मोकळी रानपाखरं
आम्ही शाळेकरी मुलं !!1!!

अभ्यास करूनी खूप शिकणार
विचारवंताचे गुण बाळगणार
उंच उंच भरारी घेणार
आम्ही शाळेकरी मुलं !!2!!

लावून झाडे जगवणार
वृक्षारोपणाचे महत्त्व पटवणार
भू मातेचे संरक्षण करणार
आम्ही शाळेकरी मुलं !!3!!

जादुटोणा, बुवाबाजी, थोतांड
स्वार्थी, धूर्त, लुटती दिनदुबळयास
त्यांना विज्ञान पटवून देणार
आम्ही शाळेकरी मुलं !! 4 !!

गंडे, धागे, नवस हवे कशाला
लसीकरण वेळेवर घेणार
सुदृढ आरोग्यासाठी हवा आहार
आम्ही शाळेकरी मुलं !! 5 !!

जातीभेद विसरूनी एक होऊ या
ना कुणी हिंदू, ना कुणी मुस्लिम
सर्व होऊ, होऊ आम्ही एकत्र
आम्ही शाळेकरी मुलं!!6!!

देश प्रगतीपथाकडे नेऊ या
येणा-या संकटावर मात करू या
देशाचे आम्ही भावी आधार
आम्ही शाळेकरी मुलं !!7 !!

कुसुमलता दिलीप वाकडे
नागपूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles