प्रेमकिनारा..

प्रेमकिनारा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हाती घेऊनिया हात
चाले सागर किनारा
माझ्या हळव्या मनाला
प्रिये तुझाच सहारा||१||

आहे सागर किनारी
अनमोल आठवण
कायमस्वरूपी केली
मनामध्ये साठवण||२||

तुझ्या आठवांचा सखे
मज होताच आधार
तुझी प्रेमळ सोबत
देई जीवना आकार||३||

प्रेमकिनारा जाहली
भेट पहिली आपली
तुझ्या प्रेमाची निशाणी
माझ्या मनात जपली||४||

मज आजही आठवे
भेट पहिल्या प्रेमाची
मना लागली चाहूल
अशी येणाऱ्या सुखाची||५||

आठवांचा अनमोल
प्रेमकिनारा लाभतो
प्रिये तुझ्याच येण्याची
वाट किनारी पाहतो||६||

विनायक कृष्णराव पाटील बेळगाव
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles