‘आयुष्याला संजीवनी देणारी स्पर्शिका’; वृंदा करमरकर

आयुष्याला संजीवनी देणारी स्पर्शिका’; वृंदा करमरकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण

“आत आपुल्या झरा झुळझुळे निळा स्वच्छंद,
जगणे म्हणजे उधळीत जाणे ह्रदयातील आनंद.

घनधारांतून ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा
बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा
मनात पाउस बरसे उधळीत मातीचा मधुगंध
जगणे म्हणजे उधळीत जाणे ह्रदयातील आनंद”

ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या या जीवन विषयक कवितेप्रमाणे जीवन हे वास्तविक आनंदाने जगण्यासाठी आहे. पण जीवनात सुखदुःख हे एका मागोमाग येतच असते.पण त्यातील दुःख वजा करून सुखाचा विचार केला तर ते लोभसवाणं वाटतं.जीवनात कधीतरी एखादी घटना घडते.ती आपल्या मनाला स्पर्श करते आणि मन आनंदी होते. एखादी कौतुकाची थाप,एखादं बक्षीस, आयुष्यात भेटलेली प्रिय व्यक्ती या एखाद्या स्पर्शिकेसारख्या आपल्या मनाला स्पर्श करून जातात आणि त्यामुळं सारी दुःख विसरून आपण पुन्हा नव्या दमानं काम करू लागतो.

*मी स्मरणाच्या वाटांनी फिरतो*
*क्षण भेटीचे आपल्या आठवतो*
*तू होतीस स्पर्शिका माझी*

राधा श्रीहरीसाठी वेडी होते. तिला तो कुठंही दिसत नाही. शोधून शोधून ती थकते.यमुना काठी, कदंब तळी,साऱ्या गोकुळात त्याला शोधते.पण कुठंही तो सापडत नाही. ती एकटीच उदास बसली असतानाअचानक वेळूच्या बनातून कान्ह्याच्या बासरीचे सूर घुमतात ते राधेच्या कानी पडतात आणि त्या मोहमयी स्वर स्पर्शिकेनं ती थरारते. फुलारते आणि उत्साहानं वेळूच्या बनाकडं जाते.ब-याचदा पूर्वायुष्यात एखादी प्रिय व्यक्ती आपल्या जीवनात आलेली
असते.तिच्या सहवासाने आपले व्यक्तिमत्त्व खुलते.पण ती पुढं दुरावते.पण त्या जुन्या आठवणी अजूनही मनाला आनंद देत असतात.

“बंध रेशमी तुझ्यासवे जुळूनी
स्पर्शिका तू रंग नवे लेऊनी
आता क्षितीज रंग फक्त आठव तळ्यात”

वैशाख वणवा, उन्हाच्या तीव्र झळा. सारा निसर्ग तहानलेला. जमीन भेगाळलेली…पावसासाठी आतुरलेली.अशावेळी मृगाची सर येते. धरती फुलारते,मोहरते.

*ती झरली सर मृगाची*
*जशी स्पर्शिका सुखाची*
*स्वप्ने हिरवी डोळ्यात माझ्या*

अशी जीवनात आनंद निर्माण करणारी ही सर म्हणजे स्पर्शिका दुःखावर हळुवार फुंकर घालणारी. गणितीय भाषेत स्पर्शिकेची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. “वर्तुळाच्या एकाच बिंदूला स्पर्श करणा-या रेषाखंडास अथवा रेषेस “स्पर्शिका” म्हणतात.” पण आपल्या व्यवहारात ही स्पर्शिका
खूप वेगळे काम करते.कधी जीवनात रंग भरते, कधी सूर देते,ताल देते. एखादी अनवट सुरावट सुध्दा नादभरी स्पर्शिका होते.अशी ही आनंददायी स्पर्शिका मग आठवणीत राहते आणि त्रिवेणी बनून कागदावर उमटते.

*तू होतीस स्पर्शिका माझी*
*तेंव्हा क्षण होते दरवळलेले*
*आता प्रश्र्न हाती फक्त अवघडलेले*

आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी एकदम हटके ‘स्पर्शिका’ विषय दिला आणि सर्वांना सखोल विचार करायला प्रवृत्त केले. सरांचा नेहमीच प्रयत्न असतो सारस्वतांनी बहुआयामी लिखाण करावं. बहुश्रुत व्हावं. शिलेदारांनी पण स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन आदरणीय राहुल सरांनी मला काव्यत्रिवेणी परीक्षण लिखाणाची संधी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. सप्ताहात सर्वच दिवशी कोणती ना कोणती स्पर्धा आयोजित केल्या जाते. आपण हिरीरीने सहभागी होऊन लिखाणही करता , परंतु सन्मानपत्रासाठी फोटोच पाठवत नाही. अनेकजण तर निकाल व संकलनही वाचत नाही. शोकांतिका म्हणावं की हेतूपुरस्सर, रितसर दुर्लक्ष करतात, मराठीचे शिलेदार समूहाच्या सन्मानपत्राची गरज नसल्यास कृपया स्पर्धेच्या दिवशी लिखाण न केलेले बरे कारण याच दिवशी आपण इतरही गल्लीतल्या समूहात सन्मानित झालेले असल्याने अर्ध्या हळकुंडातच…
दिवस आनंदी करतात हे लक्षणीय.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles