“साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे”

“साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे”
आधुनिक भारताच्या इतिहासात अनेक थोर साहित्यिक उद्याला आले. आपल्या साहित्यातून त्यांनी भारतीय समाजात जागृती करून नवी जीवनमूल्य रुजवली. अशा अनेक प्रतिभावंत साहित्यिकापैकी अण्णाभाऊ साठे एक थोर प्रतिभावंत साहित्यिक आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी कथासंग्रह,नाटके,प्रवास वर्णन,कादंबऱ्या,पोवाडे,लावणी असे विविध प्रकारचे लेखन करून साहित्य क्षेत्रात अमोल अशी क्रांती घडवून आणली.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून श्रमिक,दलित,शेतकरी,शेतमजूर मजूर,कामगार जनतेचे जे दुःख होते तेच अण्णा भाऊ साठेची असल्यामुळे त्यांनी आपल्या तळपत्या शाहिरीद्वारे दुःखाचे स्वरूप जनतेसमोर मांडले. त्या दुःखाची कारणमीमांसाही समाजासमोर मांडली. शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे परंतु हे जग त्या पोशिंदालाच दुःखाच्या खाईत ढकलत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या गीताच्या माध्यमातून उपदेश करून जग बदलण्याचे आवाहन करतात.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तू मराठ मोळा शेतकरी घोंगडी शिरी,
जुनी ती काठी , जुनी लंगोटी,
बदल ही दुनिया सारी रे,
चल बदल ही दुनिया सारी रे ||

अण्णाभाऊ शेतकऱ्यांना हे जग बदलण्याचे आव्हान का करतात? तर जगाचा पालनकर्ता पावसात,थंडीवाऱ्यात,उन्हातान्हात,रात्रंदिवस शेतात राब राब राबून मोत्यासारखे पीक पिकवतो. आणि सर्व जनतेला जगवितो. परंतु त्याने पिकविलेल्या धान्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत. त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. एवढा तो आर्थिक विवंचनेत सापडतो. त्यातून सुटका करून घेण्यासाठी संघर्षाच्या माध्यमातून जग बदलण्याचे आव्हान शेतकरी,कामगार,मजूर दार बांधवांना करतात. आणि पुढील लावणीत म्हणतात.

तू खाशी कांदा भाकरी बसून आंधारी | भुकेला कोंडा,निजेला धोंडा, बदल ही दुनिया सारी ||

अण्णाभाऊ साठे शेतकरी वर्गाला जुलमी व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे आवाहन करतात.
अण्णाभाऊंनी महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता,स्वातंत्र्य,सामाजिक न्यायाच्या विचाराची,परिवर्तनाची चळवळ अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून पुढे चालविली. अण्णाभाऊ आपल्या गीतात म्हणतात,

जग बदल घालुनी घाव |
सांगून गेले मला भिमराव ||
गुलामगिरीच्या या चिखलात |
रुतून बसला का ऐरावत ||

या भारत देशातून विषमता,जातीभेद,वर्णभेद, उच्चनीच्चता दूर होऊन सामाजिक समानता प्रस्थापित व्हावी या उद्देशातून ते पुढील ओळींमध्ये म्हणतात.

ठरवून आम्हा हीन नकलंकीत |
जन्मोजन्मी करुनी अंकीत ||
जीने लावूनी वर अवमानित |
निर्मुन हा भेदभाव ||
एकजुटीच्या या रथावरती |
आरुढ होऊनी चल बा पुढती ||
नव महाराष्ट्रा निर्मुन जागती |
करी प्रगट नीज नाव ||

अण्णाभाऊ साठे यांनी “मुंबईची लावणी” लिहून समाजातील कष्टकरी,मजूर,गिरणी कामगारांची व त्यांच्या कुटुंबांची,त्यांच्या मुलाबाळाची होणारी दुरावस्था पुढील प्रमाणे चित्रित केली आहे.

लोअर,परळ,चिंचपोकळी-वरळीच्या त्या जुन्या चाळी |
नाही नया रंग त्यांच्या भिंतीवरती ||
नायगाव,धारावीला-माटुंग्याच्या शेजाऱ्याला | बेकारांची पोर घाणीमध्ये लोळती ||
लाल झेंडा घेऊन हाती-करायला येथे क्रांती |
मजुरांची पिढी नवी पाऊल टाकती ||
अण्णाभाऊ साठे म्हणे-बदलून हे दुबळे जिने |
होणार जे विजयी ते रण करती ||
पृथ्वीही शेषाच्या फन्यावर उभी नसून ती श्रमिक, शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी,कामगार यांच्या तळहातावर पेललेली आहे. म्हणून अण्णाभाऊ शेतकरी,कामकरी,कामगार,मजूर या जनतेच्या हाताची पूजा करताना म्हणतात,

प्रारंभी मी आजला-कर त्याचा आम्ही पुजीला |
जो व्यापूनी जगाला,हलवी या भूगोलाला ||
ज्याला जगी तुलना-नाही अंत पाताळाचा घेई |
मानवाची करी जो भक्ती-जो उठूनिया रंकाला ||
तोडूनिया जुलमी शृंखला-तो मी आज पूजीला |

अण्णाभाऊ साठे या महामानवाने अलौकिक असे साहित्य निर्माण केले. अनेक भाषेमध्ये त्यांचे साहित्य भाषांतरित झालेले आहे. अण्णाभाऊंच्या प्रचंड साहित्यामुळे त्यांना “साहित्यसम्राट”असे म्हणतात. अशा या महान, विद् वान साहित्यरत्नला कोटी कोटी विनम्र अभिवादन !

इंगोले रमेश सुदामराव

प्राथमिक शिक्षक,

के.प्रा.शा मेथा ता.औंढा

मो नं _7350653126.
कस्ट्राईब शिक्षक संघटना विभागीय उपाध्यक्ष.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles