‘तो’ एक तास..

‘तो’ एक तास



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

धकाधकीच्या जीवनात
नातेगोते व,सखेसोयरे,
सारेच ऑनलाईन झाले
वेळेअभावी,दुःखी बिचारे.

एकदाच येतो रविवार
आठवड्यातून केवळ,
गृहिणी राबती मरमर
मात्र, घरदार ठेवी निर्मळ.

काढीते फुरसत कामातून
जगते, जरा स्वतः साठी,
तो एक तास, रोज देते
छंद,माझा जोपासण्यासाठी.

अंतर्मुख होते मी मनात
मिळेना वेळ स्वतःसाठी,
भेटता तो एक तास रिकामा
जगते, मनसोक्त स्वतःसाठी.

मन,विचारांचे सौदर्य खुलविते
साहित्यक्षेत्रात पदार्पण करून,
माझ्या,मनाला देते आकार
स्वतःच, शिल्पकार होऊन.

माहेराला जाऊन येते
तो एक तास मिळताच,
आनंदाला उधाण येते
आई बाबाला पाहताच.

मायादेवी गायकवाड
मानवत, जि.परभणी
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles