जुळवतांना जीवनाशी..

जुळवताना जीवनाशी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कालच जीवन किती माझ्यावर,
खुदूखुदू हसत होते
हसताना का?डोळे उगाचच,
पाणावले होते
बसले होते जराशी शांत,
जीवना सोबत कातरवेळेला
रहस्य त्यानेही त्याच्या मनातले,
माझ्याकडे उलगडले होते
देत गेला तो त्याच्याजवळ जे,
होते ते माझ्यासाठी
मी मात्र विनाकारण तक्रारीचे,
दगड त्याच्यावर फेकले होते
हसत जगण्याची कला त्याने,
केली होती अवगत मलाही
जुळवताना जीवनाशी मी उगीचच,
खोटे मुखवटे पांघरले होते
भरभरून देत गेले जीवन,
ना मागताही मला सारे काही
काही मागे उरले काही माझ्या,
आयुष्यातून वगळले होते
काव्यांजली वाहताना जीवनावर,
शब्दांची दाटी हृदयात झाली
पण पानावर उमटवताना का?
हात माझे थरथरले होते.

सविता वामन ठाणे.
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles