काष्ट्राईब कर्मचारी महासंघाची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्न

काष्ट्राईब कर्मचारी महासंघाची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ठाणे: दिनांक ३१/७/२०२३ वार सोमवार रोजी ठीक बारा वाजता जिल्हाधिकारी ठाणे यांच्याबरोबर काष्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक झाली.
यावेळी १) सरळ सेवेतील रिक्त पदे २) अनुकंप प्रक्रियेतील रिक्त पदे ३) शंभर टक्के पदोन्नती प्रक्रिया पार पाडणे. ४) शासन निर्णयानुसार मागासवर्गीयांना कार्यकारी पदावर घेणे. या विषयावर चर्चा करण्यात आली.
५) यावेळी ठाणे पालघर समायोजन प्रक्रिया विकल्प विपरीतांवर 2016 पासून अन्याय होत आहेत या संदर्भात या कमिटीचे अध्यक्ष माननीय आयुक्त कोकण विभाग यांनी विकल्प विपरीतांना त्यांच्या जिल्ह्यात सामावून घ्यावे असे स्पष्ट निर्देश दिलेले असताना अजूनही त्याबाबत प्रक्रिया राबवली गेली नाही. जोपर्यंत येथील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक स्व जिल्ह्यातील येत नाही तोपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया राबवू नये. असे मत व्यक्त केले आहे. तरीही प्रक्रिया राबवण्यासाठी विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करून तात्काळ करून घेण्याविषयी विनंती केली जाईल असेही सांगितले. ६) मागासवर्गीय शिक्षकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जीआर असताना अग्रीम न दिल्याबद्दल जिल्हा परिषदेकडे तक्रार देऊनयही दोन महिने झाले तरी संबंधितांवर कारवाई झाली नाही हा प्रश्न विचारण्यात आला. या संदर्भात मा. सीईओ यांना कार्यवाही करावी म्हणून पत्र दिले जाईल असे सांगितले.७) भिवंडी तालुक्यातील महिला शिक्षकांच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्यासंदर्भात कारवाई का केली नाही हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला.८) 2011 च्या सेंसेस नुसार शहरी विभाग म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील कर्मचाऱ्यांना शहरी घरभाडे भत्ता देय असताना जाणीवपूर्वक दिला जात नाही तो तात्काळ मिळावा.९) समाज कल्याण अंतर्गत अनुसूचित जाती जमाती व महिला यांच्या लाभाच्या योजना देणेबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांवरती चर्चा झाली. त्यावेळी महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांचेकडून विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती माहिती मिळाली. परंतु ठाणे जिल्हा परिषद विभागातील कोणत्याही खात्याची माहिती परिपूर्ण मिळाली नाही. जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख उपस्थित राहिले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात. पुन्हा एकदा बैठक लवकरच आयोजित होईल असे, जिल्हाधिकारी विभागाकडून सांगण्यात आले.
या बैठकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी मा. मनीषा जायभाय मॅडम, ठाणे तहसीलदार मा. सूर्यवंशी मॅडम, तसेच त्याचे लिपिक आणि पोलीस खाते, महसूल खाते संपूर्ण माहितीसह उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे काही खात्यांचे त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
या सर्व प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अतिरिक्त सन्मा. सुरेश जी तांबे साहेब, दिव्यांग विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. तुषार जी भालेराव साहेब, शिक्षकांच्या प्रश्न संदर्भात महाराष्ट्र राज्य सदस्य मा. अशोक जी गायकवाड साहेब, कोकण विभाग कार्याध्यक्ष मा .दिनेश शिंदे, दिव्यांग विभाग ठाणे च्या अध्यक्ष मा सुरडकर मॅडम, हरिजन गिरीजा उन्नती मंडळ उल्हासनगर शाळेचे अध्यक्ष माने साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या शाळेतील शिक्षक बडे सर उपस्थित होते.
असे गायकवाड यांनी आपल्या शैलीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
संघटनेला चर्चेसाठी दिलेल्या वेळेबद्दल स्वतः मी मार्शल संतोष गाढे यांनी सर्व अधिकारी आणि उपस्थित कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles