वास्तवाचे भान

वास्तवाचे भानपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वास्तवाचे भान ठेवून …
स्वाभिमानानं वागायला शिक
इमान स्वार्थासाठी विकून
लाचार होऊन मागतोस भिक

वास्तवाचे भान ठेवून …
माणसानं माणसासम वागावं
संकटात मदतीचा देऊन हात
हृदयी पेटवा माणुसकीची वात

वास्तवाचे भान ठेवून …
थांबवा रे निसर्गाचाही -हास
स्वार्थामध्येच आंधळे होऊन
आयुष्याला लावू नका फास

वास्तवाचे भान ठेवून …
एकात्मतेची पेटवा रे वात
जीवनरथाची या दोनच चाकं
विकास होतो घेता हातात हात

वास्तवाचे भान ठेवून …
वेळीच व्हा रे झोपेतून जागं
जातीधर्माचं पेरून विष
माणुसकीला लावतात रे आग

वास्तवाचे भान ठेवून …
शोध सत्याचा घ्या रे अचूक
सत्य कधीच लपत नसतं
दडवण्याची करू नका घोडचूक

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles