जीवनगाणे

जीवनगाणे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आयुष्य हे कधी कुणाचे, नसते संपूर्ण परिपूर्ण,
प्रेमसंगीताच्या तालावर, सजवावे हे जीवनपर्ण.

मार्गात कुठे खाच खळगे, तर कुठे गर्द हिरवळ
सकारात्मक विचारांनी, झटकावी नैराश्य मरगळ.

जपावी प्रेमाची भावना,नकोच नुसते रडगाणे
अंतर्मनाच्या ओढीने, गात राहावे जीवनगाणे.

प्रत्येकाच्या भावना जाणून, टिपावे गुण दर्शन
सुखदुःखात साथ देऊन, समृद्ध करावे जीवन.

मित्र-मैत्रिणीं समवेत, निवळावा मनावरचा ताण
स्वैर भावनांना आवरून, ठेवावी संस्कारांची जाण.

विसरू नका हो कधी, निसर्गाचे बेहिशेबी प्रेम
सतर्कतेने स्वार्थ सोडून, निसर्गाचा पाळा नेम.

जगण्याची कला शिकवतो, प्रेरणादायी निसर्ग,
त्याग समर्पण निखळ प्रेमाने, धरेचा बनवू स्वर्ग.

षडरसयुक्त हे जीवनगाणे,मनसोक्त आस्वाद घेऊ,
सुखाच्या पैलतीरावर, जीवननौका सहज नेऊ.

सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.
======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles