मी शब्दांचा पुजारी

“मी शब्दांचा पुजारी”पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मी शब्दांचा पुजारी
शब्द नांदतात वैखरी

शब्दांना जोडले मी
भावनांच्या विश्वाशी
जाणण्या महत्त्व त्यांचे
जावे लागेल तळाशी…

शब्द नाहीच कधी विषारी
मी शब्दांचा पुजारी.१

शब्द असतात अंतरीचे
भावना तितक्याच खोल
मीच जाणतो माझ्या
शब्दांचे खरे मोल….

शब्द लागणार ना जिव्हारी
मी शब्दांचा पुजारी…२

शब्द देतात बळ
मजला लढण्यासाठी
समाजमनाच्या दुःखावर
फुंकर घालण्यासाठी…

शब्द माझे मुळी विचारी
मी शब्दांचा पुजारी..३

घेतले व्रत हे मी शब्दांनी माणसे जोडण्याचे
झाला गैरसमज कधी जर
त्यालाही तोडण्याचे

शब्द नाहीत कधी लाचारी
मी शब्दांचा पुजारी..४

शब्द हेच धन माझे
तीच माझी खरी दौलत आयुष्य्याच्या वाटेवरची
हीच माझी बरी मिळकत

शब्द असतात कधी शस्रापरी
मी शब्दांचा पुजारी..५

शब्दांनी जोडतो मी
माणसे मनामनांत
शब्दांनी शोधतो मी
देवत्व कणकणात..

शब्द माझे देणगी ईश्वरी
मी शब्दांचा पुजारी..६

शब्दच देतील मजसी
सामर्थ्य अलौकिक
शब्दच वाढवतील माझा
अतुलनीय नावलौकिक …

शब्द माझे तारणहारी
मी शब्दांचा पुजारी..७

वंदन प्रभूचरणी करतो
एकच माझी प्रार्थना
अशीच अबाधित राहो
ही माझी शब्दसाधना..

शब्द नकोत माझे अहंकारी
मी शब्दांचा पुजारी…८

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत,जि.रायगड
======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles