मी जागृत पालक..

मी जागृत पालक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कळे न मजला मी कसला बालक
बनू इच्छितो एक जागृत पालक
कुटुंबाची जबाबदारी सांभाळत
जपतो जिवापाड बनुनी लायक

तळ हातावरील फोडासम
जपूनी मुलांचे पुरवितो हट्ट
येता परिस्थिती कधी मजवरी
बनत असतो मी निगरगट्ट

जाणिव व्हावी परिस्थितीची
यास्तव होतो कधी अलिप्त
संघर्षाचा प्रतिकार करण्या
वर्तणूक करतो माझी सक्त

कधी पाठीशी राहून त्यांच्या
देत असतो दुजोरा पर्याप्त
लढण्यासाठी तयार करण्या
व्हावे लागते कधी संतप्त

खचून जाता कधी प्रसंगी
खुप हिंमत त्यांनाही देतो
हळवे होता काही वेळेस
कवटाळूनी हृदयाशी घेतो

उच्च स्वप्नांना मनी बाळगून
टाका आपुले पाऊल पुढती
प्रयत्नांती परमेश्वर प्राप्ती
तेंव्हा उज्वल भविष्य घडती

आहेत अपेक्षा आमच्याही बेटा
बनावे तूम्ही सुसंस्कृत मानव
परि आयाबहिणींची अब्रू लुटून
बनू नका रे निच निर्दयी दानव

जपून मुलांच्या आवडीनिवडी
ठेवतो भूमिका एक मार्गदर्शक
जीवन होण्या यशस्वी त्यांचे
राबतो एक मी जागृत पालक

प्रा. दिनकर झाडे,
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
जि. चंद्रपूर.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles