महापूर..

महापूर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अतिवृष्टीने केला घात
महापुराने घातले थैमान
वाहून गेली गुर ढोर
आहे का कुणाला जाण

नदी नाले तुडुंब भरले
शेतशिवार हे वाहून गेले
गाव वस्तीत पाणी शिरले
शेवटी कुणीच नाही उरले

हाहाकार सगळीकडे माजला
पुरात वाहून गेले सगळे
कुणी न धावले मदतीला
भरून आले माझे डोळे

रस्ते पुल वाहून गेले
पुरात माणस अडकली
मदतीची मारली हाक
निराधार होऊन, तिथेच थबकली.

अनेकांनी प्रयत्न केले
पुरातून बाहेर पडण्याचे
नशिबाने नाही दिली साथ
परतूनीय घरी जाण्याचे

या महापुराने केला घाला
जीव वाचण्या तडफडले
नियतीला नाही आली कीव
यात अनेकांचे गेले जीव

शासनाने नाही घेतली दखल
राहीले त्यांचे संसार उघड्यावर
स्वजन आता गेले सोडून
म्हणे सरकार आहे दौऱ्यावर

कमल दवंडे परभणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles