बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*सूचनार्थ*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लक्षात कोण घेतोय, पोटतिडीकीचा सूचनार्थ
बेफिकीर मनोवृत्तीचा,कसा लावावा अन्वयार्थ…//

डोळे असून आंधळेच, शिक्षित असूनही व्यर्थ
मुक्या बहिर्‍याच्या सोंगात, कांहीच नाही अर्थ.. //

ज्याला त्याला वाटते, जणू माझा मीच समर्थ
फाजील आत्मविश्वासानेच, होतात खूप अनर्थ.. //

कधी जिविताशी निगडीत, असतात गर्भितार्थ
अशा गंभीर सूचनांचा, जाणून घ्यावा मतितार्थ.. //

कधी सांकेतिक भाषेत, लपलेले गूढ गहनार्थ
कोड्यातल्या सुचनांचेही, ज्ञान असावे यथार्थ.. //

उगाच नकोत कुतर्क, ऐकूनी फक्त लौकिकार्थ
चौकस बुद्धीने जाणून घ्यावे, मूळातले गूढार्थ.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

पत्र असो वा संदेश
लक्षात घेऊन सूचनार्थ
करावे आदर्श वाचन
टळेल भावी अनर्थ…
जीवन असो वा खेळ
नितांत गरज नियमांची
करता सूचनांचे पालन
सुरळीत घडी बसे साऱ्यांची…
सूचना जणू जीवनाचा
अविभाज्य घटक
पर्यटन स्थळ असो वा कार्यालय
लावतात अनेक सूचनाफलक…
जाणून जीवाचे मोल
कर सूचनेचे पालन
जीवनी येईल सुसूत्रता
घाल मनाला बंधन…
सूचनेचा जेव्हा
समजेल मतितार्थ
टाळून अपघात
जगणे करावे सार्थ…
गिरवून नियमांचे धडे
लक्षात घ्यावा सूचनार्थ
शिस्तबद्धता येईल जीवनी
जगण्याला येईल अर्थ..…..

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

सूचनार्थ समजून घेण्या
व्हावे वाचक आदर्श
जाणून घेता अन्वयार्थ
करता येतो परामर्श

जाणून बुजून डोळेझाक
मग कळेना सूचनार्थ
तन,मन एकवटून
जाणून घ्यावे मतीतार्थ

सूचनार्थ कळता योग्य
समजे कामाचा मार्ग
होत नाहीत चुका आणि
दर्जेदार होई कार्य

कळत नकळत घडती
अनावधाने काही चुका
वारंवार वाचून कळेल
सुचनांचा मूळ गाभा

मन,बुद्धी,तन,भाव
गुंफण तयांची गुंफून
सूचनार्थ लक्षात घ्यावा
होण्या कार्य नटून

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

खेळ वेड्या भावनांचा
कधी उद्विग्न क्षणांचा
नको सूचना वजा प्रश्नांचा
प्रेमळ भाव त्यागाचा….

हेवा मिळाल्या वेळेचा
असणाऱ्या बंधनांचा.
किती मर्यादा आखल्या तरी
तुला नजरेत शोधण्याचा

अबोल मनाला म्हणतो
क्षण क्षण रडवण्याचा…
तक्रारी नकोत आता
आनंद हसऱ्या क्षणांचा

वेडावून टाकी जीवा
तुझ्या तोडून बोलण्याचा
त्रास होतो मना…
तुझ्या शब्दांना झेलण्याचा

वाद नकोत संवाद हवा
धीर धरता आनंद हवा
मी नसतो तसा कधी
मनातली भाषा समजते तेव्हा

नेहमीच सूचनार्थ भाषा
संपून जाई सगळ्याआशा
वाट पाहणं नकोत आता
उरल्यात फक्त अपेक्षा

*सौ.सिंधू बनसोडे .इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

संभाव्य चुका टाळण्यास
सूचनार्थ वाचन कराय हवे,
यथायोग्य उलगडा होऊन
बोध त्यातून मिळे नव नवे…

पावक करायला असतात
सूचना योग्य तेथे दिलेल्या,
मार्गदर्शक दिशा दाखवत
योग्य मार्गक्रमण केलेल्या…

करावे अनुपालन सूचनांचे
अमुलाग्र वर्तन बदलायाचे,
समयसूचकता प्रसंगोपात
योग्य बजावणी करण्याचे…

धोक्याची घंटा असे कधी
सावधानतेचा इशारा असे,
सूचनार्थ वाचून काळजीने
परिस्थीतीचे गांभीर्य दिसे…

परिक्षेतही सूचना असतात
काळजीपुर्वक वाचावयाला,
वेळातलावेळ काढून वाचा
पुढील सोयीस्कर व्हायला…

जडणघडणीमध्ये अनमोल
सूचनार्थ संकेत पाळायला,
तेच मोलाचं योगदान ठरेल
जाणारा तोल सावरायला…

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*” सूचनार्थ “*

साहित्यगंध साप्ताहिक
शतकी उत्सव गाठलं
काव्यरचना पाठवायला
घाई करु नये म्हटलं..!

अटीशर्ती लागू आहेत
रचना पाठवण्यासाठी
सर्वांनी लक्ष द्यावेत ,
त्या पाच कडव्यांसाठी..!

वारंवार सुचना करून
कुणी लक्ष देत नसतात
चुका करुन बहुतेक ,
माफी मागत असतात

मराठीचे शिलेदार तसे
बरेच जण लई हुशार
प्रेमाच्या लढाईत कुणी
काढत नाही तलवार..!

ताई दादा म्हणत बरे
खुप प्रसंशा करतात
समुह आहे घर जसा
इथे प्रेमाने वावरतात

ज्यांना वाटतंय येथे
आपलीही रचना यावी
चूका करु नये अशी
सुचना अवश्य करावी

सुचलेले तेच सांगतो
आजचा विषय सूचनार्थ
मी मराठीचा शिलेदार
आहे अभिमान याचा सार्थ

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

माहिती सुचनार्थ
करु वृक्षसंवर्धन
जतन प्राणपणाने
टाळुया अनर्थ

सुचनार्थ संदेश दिला
स्वच्छ भारत सुंदर भारत
जागोजागी ढीग कचऱ्याचे
आंधळेपणाचे लोण पसरत

ज्ञानी समजतो
आम्ही स्वतःला
सुचनार्थ सुचनेचा
अन्वयार्थ लावला

स्वच्छतेची कास धरुया
देशाभिमानी कार्य करुया
सुचनार्थ माहितीचे
पालन करुया.

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles