बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*सूचनार्थ*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सूचनार्थ अवलोकन
असे सर्वांनी करावे
शिस्तबद्ध नियम
प्रत्येकानी पाळावे

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

अनुभवी व्यक्तींचे बोल
समजून घ्या हो जरा
सूचनार्थ वागणे त्यांचे
जणू अनुभवांचा ठेवा खरा…

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

गुरुजनांचे सूचनार्थ बोल
मुलांनी घेतले मनावर
तर पश्चाताप करण्याची
वेळ येत नाही कुणावर ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

फलकावरील आवश्यक सुचनार्थ वाचून
समजून घ्यावा त्याचा योग्य अर्थ
नियमांचे केले काटेकोर पालन तर
जीवनात घडत नाही कधी अनर्थ

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

ऐकावे जनाचे करावे मनाचे,
लावूनी ऐकल्या सूचनार्थ,
असे शब्दांचा खेळ सारा,
आपापल्या परी लावी सूचनार्थ खरा//

*सौ.उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

कच-याचे व्यवस्थापन
करावे व्यवस्थित
सूचनार्थ सर्वांच्या
अन्यथा पर्यावरण होईल दुषित

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*सूचनार्थ*

सृजनाचे असतो काम
सुचनार्थ करून त्यांना
जिवनात त्यांना तकलीफ नको
सुख शांती मिळावी सर्वांना

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles