कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे पदवीधर शिक्षकांचे वेतन श्रेणी दुरुस्ती आदेश देण्याबाबत सी ई ओ व शिक्षणाधिका-यांना निवेदन

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे पदवीधर शिक्षकांचे वेतन श्रेणी दुरुस्ती आदेश देण्याबाबत सी ई ओ व शिक्षणाधिका-यांना निवेदन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: प्राथमिक पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणीचे दुरुस्ती आदेश देण्याचे निवेदन मून साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना आज दि २/०८/२३ रोजी देण्यात आले. याचबरोबर गणेश शिंदे साहेब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनाही कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. हे निवेदन शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून यावेळी परभणी जिल्ह्यातील पवित्र पोर्टल 2019 च्या सर्व प्राथमिक पदवीधर शिक्षक भरतीच्या बॅच चे सर्व प्राथमिक पदवीधर शिक्षक उपस्थित होते.

तसेच शिक्षक संघटनेचे जिल्हा कोषाध्यक्ष विशाल प्रधान सर, संजय गुजर सर, हेमंत गुंड, निलेश ठोकळ, खेडकर सर व जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षक व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अनेक पदाधिकारी, शिलेदार यावेळी उपस्थीत होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी व्ही.सी .चालू असताना सुद्धा निवेदन स्वीकारले ,तसेच यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद परभणी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मिटींगला असून सुद्धा बाहेर येऊन शिक्षकांचे निवेदन स्वीकारले. त्याबद्दल मा. गणेश शिंदे सरांचे संघटनेच्या वतीने व सर्व शिक्षक बांधवांच्या आभार मानण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles