हिंगोली गोळीबाराचा आवाज विधानसभेत गाजला

हिंगोली गोळीबाराचा आवाज विधानसभेत गाजला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भाजप आमदारांनी केली सीआयडी चौकशीची मागणी,

मुख्य आरोपीं सामूहिक बलात्कार प्रकरणात चार वर्षे होता जेल मध्ये.

हिंगोली: हिंगोली येथे भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना विधानसभेत गाजली आहे.

या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी विधानसभेत केली आहे. पप्पू चव्हाण यांच्यावर मंगळवारी जिल्हा परिषद आवारात गोळीबार करण्यात आला होता त्यात ते गंभीर जखमी झाले होते. आता त्यांची प्रकृती चांगली असून पोलिसांनी पाच जनावर गुन्हा दाखल केला व दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

*मुख्य आरोपी अक्षय इंदोरिया 4 वर्षे पुण्याच्या जेलमध्ये*

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अक्षय इंदोरिया हा सन 2015 मध्ये पुणे येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपी आहे. या प्रकरणामध्ये तो चार वर्षे पुण्याच्या जेलमध्ये होता. काही दिवसापूर्वीच तो हिंगोलीत आल्याची
माहीत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles