साहित्य विश्वातील प्रसिद्ध रानकवी पद्मश्री ना. धो. महानोर आज काळाच्या पडद्याआड

साहित्य विश्वातील प्रसिद्ध रानकवी पद्मश्री ना. धो. महानोर आज काळाच्या पडद्याआडपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

गोंदिया/ अर्जुनी मोर: मराठी साहित्य विश्वाला आजन्म वाहून घेणारे प्रसिद्ध रानकवी माजी आमदार पद्मश्री ना. धो. महानोर यांनी आज पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.साहित्य विश्वाला त्यांचं अतिशय मोठे योगदान आहे..

काळ्या तांबड्या मातीचा टिळा दगड धोंड्यांना
आम्ही भरला मरवट हिरव्या बिलोरी झाडांना..

अशा अनेक कवितांमधून
बहिणाबाईंचा व बालकवींचा वारसा समृद्ध करणारे..उच्च प्रतिभाशक्ती व पराकोटीची कल्पकशक्ती लाभलेले हे कवी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसगाव येथे जन्मलेले.. 1978 साली महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले होते.राजकीय कारकीर्दही अतिशय निर्व्याजपणे व निःस्वार्थपणे त्यांनी गाजवली..तसेच 2003 साली नागपूर येथील पहिल्या जलसाहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली..

साहित्य विश्वातही.. जगाला प्रेम अर्पावे,त्या आठवणींचा झोका,दिवे लागणीची वेळ, पावसाळी कविता, नक्षत्रांचे देणे, पानझड तिची कहाणी असे कित्येक कवितासंग्रह व पळसखेडची गाणी म्हणजे तर मराठवाडी लोकगीतांचा खजिनाच साहित्यविश्वाला अर्पण करणारं हे दर्पण.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले.. कृषिभूषण, जीवनगौरव पुरस्कार, वनश्री पुरस्कार, कृषीरत्न पुरस्कार, कुसुमाग्रज् प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, यशवंत वेणू पुरस्कार ,साहित्य अकादमीचा पुरस्कार, कृषी क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल सुवर्णपदक, जागतिक चित्रपट महोत्सवाचा गीतकार जीवन गौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्काराने सन्मानित ना. धो. महानोर हे आज काळाच्या पडद्याआड गेलेत. त्यांचं साहित्यिक बहुमूल्य योगदान व साहित्यशब्दरत्नधन नेहमीच साहित्य क्षेत्रात अजरामर राहील.. मराठीचे शिलेदार समूहातर्फे ना.धो. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles