गायब झालेल्या मुलीचा मृतदेह कालव्यात आढळला

गायब झालेल्या मुलीचा मृतदेह कालव्यात आढळला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वेळापूर पोलिस ठाण्यात ग्रामस्थांची गर्दी

पंढरपूर: इयत्ता पहिलीच्या वर्गातील गायब झालेल्या आदिती चौगुले या सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह श्रीपूर जवळ एका कालव्यात आढळून आला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास करून आरोपीला तत्काळ अटक करावी‌ या मागणीसाठी खंडाळी येथील‌ ग्रामस्थांनी वेळापूर पोलिस ठाण्यात गर्दी केली आहे. पहिलीच्या वर्गात शिकणारी सहा वर्षाची आदिती चौगुले ही 2 आॅगष्ट रोजी माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावातील शाळेतून गायब झाली होती. या प्रकरणी वेळापूर पोलिस ठाण्यात शाळेच्या वतीने सोमनाथ पांडुरंग सगर यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान आज सायंकाळी गायब झालेल्या आदिती चौगुले या मुलीचा‌ मृतदेह माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील नीरा कालव्यात आढळून आला आहे.आदिती चौगुले ही मुलगी खंडाळी (दत्तनगर) येथील भाऊसाहेब राऊत विद्यामंदिर शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकते. 2 आॅगष्ट रोजी ती सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. दुपारच्या सुट्टीमध्ये आदितीने तिच्या मैत्रींसोबत जेवण केले. जेवणानंतर घरी जाऊन येते असे सांगून ती गेली होती. त्यानंतर आदिती शाळेत परत आलीच नाही. आज सायंकाळी तीचा मृतदेह आढळला आला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या हत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आदितीचा शिक्षकांनी व तिच्या घरच्यांनी शोध घेतला असता ती अद्याप मिळून आली नाही.

याप्रकरणी शाळेतील शिक्षक सोमनाथ पांडुरंग सगर यांनी आदिती चौगुले हिला कोणीतरी अज्ञात कारणाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वेळापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आदिती हिचा शोध सुरू केला आहे दरम्यान या घटनेमुळे खंडाळी व वेळापूर परिसरातील पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles