‘साहित्यिकांनी राष्ट्र परम वैभवाला नेण्यासाठी योगदान द्यावे’; डाॅ.मधुसूदन घाणेकर

‘साहित्यिकांनी राष्ट्र परम वैभवाला नेण्यासाठी योगदान द्यावे’; डाॅ.मधुसूदन घाणेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, प्रतिनिधी

पुणे : समता, समानता, समरसता, प्रेम, सद्भावना, बंधुत्व हे शब्द केवळ साहित्यात लिहिण्यापुरते मर्यादित न ठेवता साहित्यिकांनी त्याचे आचरण करुन राष्ट्र परम वैभवाला नेण्यासाठी योगदान द्यावे ” असे प्रतिपादन पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष , आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत-विचारवंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.साहित्य गौरव संस्थेच्या 14 व्या साहित्य गौरव संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.घाणेकर बोलत होते.

साहित्यिकांनी आपले साहित्य शाश्वत ठरावे यासाठी अनुभूतिची क्षेत्रं विस्तारित कशी होतील यादृष्टीनेही प्रयत्नशील रहावे असेही, डाॅ.मधुसूदन घाणेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले . संमेलनाचे प्रास्ताविक साहित्य गौरवच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक यांनी केले. डाॅ.सुवर्णा सुत्रावे यांनी केले. तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया दामले, वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्षा वसुधा नाईक, सुप्रसिध्द ज्योतिर्विद डाॅ.प्रसन्न मुळे, डाॅ.रमणलाल भुतडा तसेच ॲड. ज्ञानेश्वर काची आणि डाॅ.अश्विनी पुणतांबेकर, डाॅ.वसुंधरा शिवणेकर हे मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डाॅ.लक्ष्मण शिवणेकर यांना डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. किती लिहायचे यापेक्षा काय लिहायचे यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यानेच साहित्य क्षेत्रात प्रगति करु शकल्याचे डाॅ.शिवणेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. जीवन गौरव पुरस्कार साहित्यिकांच्या जगण्यातील दुर्दम्य आशावाद अधिक वृध्दिंगत करतात असेही त्यांनी पुढे सांगितले.

काव्य, कादंबरी, तसेच ज्योतिष विषयक वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणा-या डाॅ. माधव पुराणिक, सूर्यकांत भोसले, प्रा.शालिनी सहारे, दिपाली निखळ , डाॅ.सुवर्णा सुत्रावे आदिंना डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते 2023 चे साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. रुपाली भोरकडे , ॲड.मिलिंद चिंधडे,सुप्रिया भारस्वाडकर,
आदि पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित 436 वा डहाळी विशेषांकही मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles