‘बांधावर बसून कविता लिहिणा-या रानकवीच्या आठवणीत’; प्रा तारका रुखमोडे

‘बांधावर बसून कविता लिहिणा-या रानकवीच्या आठवणीत’; प्रा तारका रुखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्य अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

असं अक्षरवाङमय अख्ख्या महाराष्ट्राला अर्पण करणारं, मनामनात हिरवं चैतन्य पेरणारं, ‘मराठी’ साहित्य सृष्टीला मिळालेलं एक हिरवगार सृजनशील रान म्हणजे ‘रानकवी’ पद्मश्री ना. धों.महानोर. ‘हे खेडे अंधाराचे, हे खेडे प्रकाशाचे’ जन्मोजन्मी लक्तरलेले दुःख घेऊन चालत आले. मर्त्यकाच्या दुःखा परीस पांघर घालून आयुष्याची. लखलख उन्हात न्हावून धुवून बरसातीला गाणे गाते. हे खेडे मोरापरीस मेघांसाठी थिरकत जाते. ढेकळांच्या गर्तेमधून माती नवा जन्म घेते. ग्रीष्माचं जगणं असो वा पावसाळ्यातलं हिरवं जगणं. या सर्व विदारक जगण्यातून एकरूप होताना निष्पर्ण झालेली मने व खेडी एका संवेदनशील जाणीवेत मांडताना ज्याची लेखणी थकत नाही असा आकाशाच्या उंचीचा हा कवी सतत जमिनीवर पाय ठेवून शेतशिवारात वावरत राहिला.

राजकारणाचं वलय प्राप्त होऊनही शहरी न होता त्यांची नाळ आपल्या मातीशीच जुळलेली. त्यांचं मन पळसखेड्याच्या रानातच रमलं. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. तब्बल अकरा कविता संग्रह ,अजिंठा खंडकाव्य, प्रकाशित वही, पळसखेडची गाणी लोकगीत संग्रह, जैत रे जैत अशा अनेक चित्रपटांना त्यांच्या कविता गाणे रुपात आविष्कृत झालेल्या. कसलेल्या शब्दगंधेच्या बळावर स्त्रीजीवनाची व्यथा वेदना चितारते. तर एकीकडे दूर गेलेल्या पायवाटा डोंगरांच्या पायथ्याशी,पंख मिटल्या झोपड्यांचं दुःख कवटाळे उराशी. या आर्त ओळीही अवघा मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना “हे दयाघना भरभक्कम ये” अशी आर्त विनवणी त्यांचं कवी मन करते. पाषाणातून पाझर फोडण्याचं सामर्थ्य त्यांच्या कवितेत सामावलेलं आहे.

ह्या शेताने लळा लाविला असा असा की
सुखदुःखाशी परस्पराला हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जाहला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..

उध्वस्त बकालपणा सर्वत्र वाढलेला असतानाही व प्रचंड निराशा चौफेर पसरलेली असतानाही त्यांचं मन मात्र आशावादी होतं. इथल्या शेतीवर व माणसातल्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास व अंधारातही बळ देणारे त्यांचे शब्द जगण्यातला विश्वास व त्यांची खरी शक्ती बनून त्यांना संजीवनी देत राहिले. बांधावर बसून कविता लिहिणारा शेतकरी महाराष्ट्राच्या साहित्यात एकमेवा द्वितीयच. अजिंठाच्या परिसरात त्यांच्या शब्दांनी महान काव्यशिल्प कोरली अशा या हिरव्या रानाची हिरवी बोली हिरव्या ऋतूत विसावली. पण, त्यांचं ‘हे हिरवं रान’ शिलेदार साहित्यिकांच्या लेखणीतूनही हिरवगार राहावं हीच त्यांना खरी काव्य श्रद्धांजली ठरेल यासाठीच कदाचित आ. राहुल सरांनी हे चित्र दिलेलं. आपण सर्वांनी अगदी श्रद्धाभावाने काव्यपुष्प त्यांच्या चरणी अर्पण केलं. तेव्हा सर्वांचे अभिनंदन💐 कवीसम्राट महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आ. राहुल सर आपण मला परीक्षणीय लेखणीची संधी दिली त्याबद्दल आपले हृदयस्त आभार🙏

प्रा तारका रूखमोडे
अर्जुनी मोर, जि गोंदिया
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/ कवयित्री/लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles