लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन इमारतीच्या वर्गखोल्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवीन इमारतीच्या वर्गखोल्यांचा भूमिपूजन सोहळा संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी

रायगड: आज दिनांक ५ ऑगस्ट २०२३ वार शनिवार रोजी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, चोंढी-किहीमच्या शैक्षणिक संकुलात इंग्रजी माध्यमाच्या नवीन इमारतीच्या वर्गखोल्यांचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचे उदघाटक व रायगड – रत्नागिरी मतदार संघाचे विद्यमान मा.खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

संस्थेचे अध्यक्ष अॅड.प्रवीण ठाकूर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.अॅड.प्रविण ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्व.पप्पांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे व त्यास खासदार सुनिल तटकरे साहेबांचे मोलाचे हातभार लागल्याबद्दल ऋण व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी चारुहास मगर,अमित नाईक,ऋषिकांत भगत,अलिबाग तालुका माजी पंचायत समिती सदस्य भोपी, विद्यमान बेलोशी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा भोपी, कावीर ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत नाईक,किहीम ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गायकवाड,संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील,कार्यवाह रवींद्रजी ठाकूर,सहकार्यवाह संजयजी शिंदे,खजिनदार श्यामजी काठे,कायम सदस्य गणेशजी आमले,संचालिका रवीना ठाकूर,संचालक जगन्नाथ पेढवी,संचालक चांदोरकर,संचालक महेश पडते, संचालक जगन्नाथ महाले, संचालक मनोहर म्हात्रे,संचालक हेमंत सुरेकर,संचालक अक्षय वेलणकर, संचालक प्रकाश पाटील,संचालक संदेश पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत दळवी,शिक्षक सेवक प्रतिनिधी श्री.वाघमारे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक संदीप पाटील, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका सौ.पावशे,सौ.घरत,सीनियर कॉलेज प्राचार्य श्रद्धा पाटील, उपमुख्याध्यापक
बाविस्कर,पर्यवेक्षिका सौ.भारंबे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात प्रत्येक क्षेत्रात ते बदल घडवू शकतात.असे बोलताना खासदार साहेब म्हणाले.मा.खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या मनोगतात स्व.पप्पांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळायला हवे,त्यासाठी त्यांना सूसज्ज वर्गखोल्या व इमारत उपलब्ध व्हावी यासाठी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ चोंढी-किहीम संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेसाठी आपल्या खासदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने व RSP पथकाच्या विद्यार्थ्यांनी संचालनातून संगीत शिक्षक रविंद्र वाघमारे,शकेदार पाटील व श्री.माळी यांच्या मार्गदर्शनातून केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धनंजय भगत यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles