‘नागपूरचा उदयोन्मुख कलाकार ‘श्रेयस अतकर’; डॉ अनिल पावशेकर

‘नागपूरचा उदयोन्मुख कलाकार ‘श्रेयस अतकर’; डॉ अनिल पावशेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*महाराष्ट्राच्या उपराजधानीने चित्रपट व नाट्य सृष्टीला अनेक कलाकार दिले आहेत. यातील काही आजही आपली छाप सोडून आहेत तर काही यशासाठी धडपडत आहेत. या पार्श्वभूमीवर एक प्रयत्नरत, धडपड्या कलाकाराचे नांव समोर येते आणि ते म्हणजे सध्या गाजत असलेल्या व नागपूरची निर्मिती असणार्‍या ‘मायनस थर्टी वन’ चित्रपटातील अभिनेता श्रेयस अतकर याचे.*

*खरेतर बारावी नंतर नेहमीच्या वाटा सोडून आपल्या अंगभूत गुणांना न्याय देणारे क्षेत्र निवडणे आणि त्यादृष्टीने मार्ग निर्धारित करणे थोडे धाडसाचे काम आहे. मात्र याबाबतीत श्रेयसचे नक्कीच कौतुक करावे लागेल. तसं पाहिलं तर श्रेयसचा मुळ पींड अभिनयाचा. बालपणापासून त्याला नवरंग क्रिएशनच्या नाट्यमेजवानीने या क्षेत्राची गोडी निर्माण केली होती. यातूनच मग श्रेयसने बारावीनंतर नागपूर येथील व्हीएमव्ही महाविद्यालयातून अभिनय, दिग्दर्शन, एडिटींग, नाट्य संहिता लेखनाचे धडे गिरवले. मात्र त्याच्या अभिनय स्वप्नाला आकाश मोकळे करून दिले ते विरेंद्र गणवीर यांच्या बहुजन रंगभूमीने.*

*इथे त्याच्या अभिनयाच्या गाडीने वेग पकडला. ‘हिटलर की आधी मौत’ या नाट्यात त्याने हिटलरच्या बालपणापासून ते मृत्यू पर्यंतचा आलेख उभा केला. यानंतर ‘गटार’ नाट्य साकारतांना सामाजिक व्यवस्थेतले काळवंडलेले आयुष्य समोर आणले. या दोन नाट्यांनी संपूर्ण विदर्भ गाजवला. राज्य नाट्य स्पर्धेत त्याने भदंत अश्वघोष रंगवतांना वैराग्याची उकल केली. तर तमासगीर नाटकाने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. घायाळ पाखरा या नाटकात तर श्रेयसने मतिमंद मुलाची व त्याच्या वडीलांची अशी दुहेरी भूमिका पार पाडत अभियनयाचा आणखी एक टप्पा गाठला.*

*या सर्व विविधांगी भूमिकांमध्ये श्रेयसची अभिनय कला उठून दिसली. त्याच्या कसदार अभिनयाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. या कामगिरीबद्दल त्याला राज्य शासनाचा दोनदा बेस्ट अ‍ॅक्टर, सिल्व्हर मेडलचा पुरस्कार मिळाला. (यात गोल्ड मेडल नसते). बेस्ट अ‍ॅक्टर सर्टिफिकेट तब्बल बारा वेळा मिळाले. लोकांकिका स्पर्धेत तो बेस्ट अ‍ॅक्टर ठरला तर लगेचच पुरुषोत्तम करंडकाच्या बेस्ट अ‍ॅक्टर पदाचा तो मानकरी ठरला. अभिनया सोबतच श्रेयसने दिग्दर्शनात आपली चुणूक दाखवून थेंब थेंब श्वास या नाट्यासाठी दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक पटकावले.*

*त्याने आपल्या पाच वर्षाच्या छोट्या कारकीर्दीत विविध नाटकांचे एकशे पन्नासहून जास्त प्रयोग महाराष्ट्र भर सादर केले आहेत. या व्यतिरिक्त त्याचे बॉम्बे म्युझिक कंपनीचे अजनबी आणि खुली आंख का सपना हे म्युझिक अल्बम पण बरेच गाजले आहेत.सध्या २०२२ मधे ओटीटी प्लॅटफॉर्म वर ‘हाफपेस’ हा ॲमॅझॉन प्राईम इंग्लंड व मलेशिया मध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘दी फूल मुन किलर’ ही वेबसिरीज, जी तीन भारतीय भाषेत आहे, जेमप्लेक्स ॲपवर सर्वात जास्त पाहिली जात आहे. आत्ताच प्रदर्शित झालेला मायनस थर्टीवन हा चित्रपट व येवू घातलेल्या ‘पर्व’ या हिंदी चित्रपटात त्याच्या अनोख्या अभिनयाचे प्रेक्षकांना दर्शन होईल.*

*अशा या गोड, आकर्षक चेहर्‍याच्या, हरहुन्नरी अभिनेत्याला भविष्यात यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सध्या त्याची मुंबई मायानगरीत अभिनयाची घौडदौड सुरू असून त्याला आपण सर्वांकडून आपली साथ व कौतुकाची दाद अपेक्षित आहे. निश्चितच विदर्भाच्या भूमीतला हा अस्सल कलाकार एकदिवस त्याच्या स्वप्नाला गवसणी घालेल यात वाद नाही. तमाम सिनेनाट्य रसिकांतर्फे श्रेयसला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा!*
*********************************
दिनांक ०५/०८/२०२३
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles