शंकरपूर ग्रामपंचायत सदस्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शंकरपूर ग्रामपंचायत सदस्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शंकरपूर : येथील ग्रामपंचायत सदस्य संजय मणिराम नन्नावरे (४०) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. ५) दुपारी २ वाजता घडली. या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला. अमन बारेकर (१६) असे जखमीचे नाव आहे.

शंकरपूर येथे आरो फिल्टर प्लांट असून, ग्रामपंचायत सदस्य संजय ननावरे दोन वर्षांपासून चालवत होते. शनिवारी प्लांटची कामे आटोपून अमन बारेकर या युवकासोबत प्लांट बंद करण्यासाठी चॅनल गेटला हात लावला असता, त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात दोघेही कोसळले. नागरिकांनी लगेच वीज प्रवाह बंद करून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

संजय नन्नावरे यांची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे भरती केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमन बारेकर यांच्यावर उपचार सुरू आहे. मृत संजय नन्नावरे हे उच्च विद्याविभूषित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles