भरत जाधव यांना प्रिया दामले आणि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते ‘दादा कोंडके’ पुरस्कार प्रदान

भरत जाधव यांना प्रिया दामले आणि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते ‘दादा कोंडके’ पुरस्कार प्रदान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हा प्रतिनिधी, वसुधा नाईक

पुणे : तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे नुकतेच पहिले तितिक्षा राष्ट्रीय साहित्य संमेलन, पहिल्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, विचारवंत, विश्वविक्रमवीर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनात सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे , सुप्रसिद्ध नाट्य चित्रपट अभिनेते भरत जाधव यांना संस्थापक-अध्यक्ष प्रिया दामले आणि संमेलनाध्यक्ष डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाट्य चित्रपट क्षेत्रात मानधनापेक्षा पुरस्कार जास्त देतो असे भरत जाधव यांनी याप्रसंगी सांगितले. नाट्य आणि चित्रपटात सातत्याने हास्य अभिनयाबरोबरच निर्मितीचाही आनंद घेतला असून आगामी काळात एका नाटकात आवाहनात्मक अशी भूमिकाही करणार असल्याचेही भरत जाधव यांनी सांगितले.भरत जाधव यांच्या धावत्या भेटीचा उपस्थित रसिकांनी भरभरुन आनंद घेतला.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मंदा नाईक, कवी विजय जोशी, नीना दोंदे ,तितिक्षा इंटरनॅशनलच्या सचिव अजिता मुळीक, संयोजन सहाय्यक चैताली अगरवाल, वसुधा इंटरनैशनल संस्थेच्या अध्यक्षा वसुधा नाईक आदि मान्यवर उपस्थित होते. प्रा.नीना देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles