‘कास्ट्राईब महासंघ व शिक्षक संघटने’च्या नागपूर विभागीय मेळाव्याचे गडचिरोलीत २० रोजी आयोजन

‘कास्ट्राईब महासंघ व शिक्षक संघटने’च्या नागपूर विभागीय मेळाव्याचे गडचिरोलीत २० रोजी आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी करणार मार्गदर्शन

शिक्षक व इतर कर्मचारा-यांचा विविध समस्यावर तोडगा काढणार

गडचिरोली: जिल्ह्यातील कास्ट्राईब महासंघांतर्गत सर्व संघटनांचा विभागीय मेळावा घेण्यास राज्य संघटनेकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या दृष्टीने दि २० आगस्ट २०२३ रोजी ‘राजूभाऊ कात्रटवार कॉम्पलेक्स’ कुंभारे दवाखान्याजवळ, चामोर्शी जि. गडचिरोली येथे ‘कास्ट्राईब महासंघ व शिक्षक संघटने’च्या वतीने नागपूर विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष मा. गंगाधर मडावी, उदघाटक मा. गणेशदादा मडावी कार्याध्यक्ष कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य. सहउदघाटक मा. प्रभाकरजी सोनडवले, राज्य उपाध्यक्ष, कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य तथा सरचिटणीस वनविभाग कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य. प्रमुख मार्गदर्शक मा.बी. डी धुरंधर, कार्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मा.सतीश कांबळे, राज्य सरचिटणीस, कास्ट्राईब शिक्षक संघटना, मा.विजयकुमार जाधव, वरीष्ठ उपाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, मा.परशराम गोंडाणे, मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत.

आयोजित विभागीय मेळाव्यात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्हा कास्ट्राईब महासंघ तथा कास्ट्राईब शिक्षक संघटना नागपूर विभाग येथील संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. यामध्ये राजकुमार घोडेस्वार, उपाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, ओमप्रकाश वासनिक, अतिरीक्त सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, मोरेश्वर बारसागडे, अध्यक्ष कास्ट्राईब महासंघ चंद्रपूर, सुभाष गायकवाड अतिरीक्त सरचिटणीस, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, भालेराव सर, अध्यक्ष कास्ट्राईब महासंघ, भंडारा, संजय उके, जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, गोंदिया, प्रमोद मुरार, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना, म.रा.जिल्हा वर्धा, फुलमाळी सर, यांच्या प्रमुख उपस्थितीसह राज्य कार्यकारणी पदाधिकारी, कास्ट्राईब शिक्षक संघटना म.रा.चे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील मागासवर्गीय व संघटनेच्या सदस्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन चक्रपाणी कन्नाके जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना गडचिरोली, डाँ. दिवाकर नारनवरे, सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा गडचिरोली, चंदूदास रामटेके कार्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा गडचिरोली, दौलत घोडाम कोषाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना गडचिरोली, देवेद्र डोहणे सरचिटणीस कास्ट्राईब महासंघ जिल्हा गडचिरोली, प्रभाकर साखरे, सहसरचिटणीस कास्ट्राईब महासंघ जिल्हा गडचिरोली यांनी केले आहे. या विभागीय मेळाव्याच्या आयोजनात कास्ट्राईब ग्रामसेवक संघटना गडचिरोली, कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना गडचिरोली, कास्ट्राईब दिव्यांग कर्मचारी संघटना गडचिरोली, कास्ट्राईब नगर परिषद संघटना, गडचिरोली तरेच समस्त कास्ट्राईब पदाधिकारी तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी गडचिरोली हे सक्रीयपणे सहभागी होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles