मनतरंगः भावनांचा दर्पण

मनतरंगः भावनांचा दर्पणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मन एक अनाकलनीय असे गूढ. ते असते पण दिसत नाही. असे वाटते जवळ आहे, तर दूर पळते. त्याला बांधता येत नाही. मनाबद्दल सांगायचे झाल्यास, जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्व गोष्टी मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत. मनात ज्या भावभावना असतात तसे तरंग मनात निर्माण होतात. जणू भावभावनांचा दर्पण म्हणजे हे ‘मनतरंग’ कधी आनंद कधी दुःख, कधी आशा कधी निराशा, कधी उत्साह तर कधी उदासी. असे तरंग मनात निर्माण होतात….

फुलांचं बोलणं कुणाला कळलं
वाऱ्याचं गाणं कुणी ना वाचलं
मनतरंग तरी अदृश्यच…!

मनाचं एक बरं असतं. ते दिसत नसलं; तरी ते आपल्या ताब्यात रहात नाही. ते आपलं त्याला हवं तिथं जात असतं. कधी आभाळाला भिडते तर कधी भूमीवर गवतात लोळण घेते.पण बहुधा आठवतळ ढहुळताना मनतरंग त्यात भिजून चिंब होतात.आठवणींनी
उदासतात.

संवादांचे लावूनी हजार अर्थ
तू मौन धरलेस का व्यर्थ
मनतरंग उगा रंगूनी गेले

मनतरंग इंद्रधनुच्या रंगांसारखे असतात. राग, लोभ, इर्षा, प्रेम, माया ममता, शांती असे अनेक रंगतरंग असतात.असं म्हणतात आपण मनात ज्या भावना असतात तसे मनतरंग निर्माण होतात. तसेच रंग ल्यायलेले क्षितीज दिसते सायंकाळी मनातील विचार म्हणजेच तरंग. हे विचार सकारात्मक असणे गरजेचे आहे. कशीही परिस्थिती असली,अगदी प्रतिकूल ही असली तरी मनात चांगले विचारतरंग निर्माण होणे गरजेचे आहे. तरच आपण आपली प्रगती करू शकतो. मानवी मन आशादायी असते. माणसाच्या मनात आशा असते म्हणूनच विपरित परिस्थिती सुध्दा त्याच्या प्रगतीच्या आड येत नाही.

आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय राहुल सरांनी ‘मनतरंग’ विषय दिला. प्रत्येकाने आपल्या मनाची मशागत करावी, मनात सकारात्मक विचार करून ऊर्जा मिळवावी हाच यामागे उद्देश आहे. शिलेदारांनी पण स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आदरणीय राहुल सरांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद!

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक, सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles