पुरुषोत्तम अधिक मास

पुरुषोत्तम अधिक मासपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भारतीय संस्कृती ही खूप जुनी संस्कृती आहे. आपल्या भारतात सण उत्सव परंपरा, धार्मिक कार्य केले जातात. ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सूर्य, चंद्र ,तारे ,नक्षत्रस्थिती यावरून कालगणना करण्याचे तंत्र राशिभविष्य व मानवासाठी उपयुक्त अशी ज्ञानसंपदा तयार केलेली. सौरवर्ष कालगणना सर्व जगाने स्वीकारली आहे. ही व्यवस्था जागतिक स्तरावर वापरली जाते. आधुनिक युगातील अनेक व्यवहार आणि धार्मिक गोष्टी सुद्धा कालगणना पद्धतीचा वापर करून केल्या जातात .

भारतीय कालगणना पद्धतीमध्ये एक अनोखा महिना म्हणजे धोंड्याचा महिना याला आपण ‘पुरुषोत्तम मास’ असे म्हणतो. जागतिक कालगणना पद्धतीत सौर वर्ष प्राधान्य असले; तरी या पद्धतीत सौर वर्षासह चंद्र वर्षालाही महत्त्व आहे .सौरवर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जो कालावधी लागतो तो म्हणजे 365 दिवस. आणि चंद्रवर्ष म्हणजे चंद्रास पृथ्वीच्या बारा प्रदक्षिणा घालण्यास एकूण 354 दिवस लागतात तो काळ, या दोन्हींमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक आहे,ते दर तीन वर्षांनी एक महिन्याच्या बरोबरीचे होते, सौर वर्ष व चंद्र वर्षातील फरक संतुलित करण्यासाठी 33 दिवस तीन वर्षांनी अतिरिक्त महिना बनतो ज्याला अधिकमास असे नाव देण्यात आले. असे केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते आणि त्याचवेळी अधिकमासामुळे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्या कालावधीची गणना योग्यरीत्या राहण्यास मदत होते .

अधिक मासासंबंधी जसे भौगोलिक कारण आहे, तसेच त्याला पौराणिक आधारही आहे. आख्यायिकेनुसार एकदा राजा हिरण्यकश्यपणे कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देणे निशिद्ध म्हणून ब्रह्मदेवाने त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले .तेव्हा हिरण्यकश्यपणे ब्रह्माजींना असे वरदान देण्यास भाग पाडले की जगातील कोणताही पुरुष किंवा स्त्री,कोणताही प्राणी,कोणतीही देवता किंवा राक्षस त्याला मारू शकणार नाही आणि वर्षाच्या बारा महिन्यांतही कोणत्याच महिन्यात तो मारल्या जाणार नाही. त्याचा मृत्यू दिवसा किंवा रात्री नसावा .तो कोणत्याही शस्त्राने मरण पावणार नाही. त्याला घरात किंवा घराबाहेर मारले जाऊ नये. हे वरदान मिळतात हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि देवांच्या बरोबरीने समजायला लागला आणि मानव जातीवर अतोनात जुलूम अत्याचार करू लागला .तेव्हा भगवान विष्णूने अधिक मासात नरसिंह अवतार रूपात प्रकट होऊन सायंकाळच्या वेळी उंबरठ्यावर मारले.

हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीव हा पाच तत्वांनी बनलेला आहे. त्या तत्वातील. त्यांच्या स्वभावानुसार हे पाच घटक प्रत्येक सजीवाचे स्वरूप कमी अधिक प्रमाणात ठरवतात.अधिक मासातील सर्व धार्मिक कार्य ,चिंतन, ध्यान, योग इत्यादी द्वारा साधक आपल्या शरीरात असलेल्या या पाच घटकांमध्ये संतुलन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो . शारीरिक आणि अध्यात्मिक प्रगती करतो. अधिक मास हा दर तीन वर्षातून येतो .आणि तो प्रामुख्याने चैत्र महिन्यापासून अश्विन महिन्याच्या दरम्यान असतो .कार्तिक मार्गशीर्ष पौंष आणि माघ हे चार महिने आहेत ज्यांच्यात अधिक मास कधीच येत नाही. विशेष म्हणजे अधिकमास हा चंद्र आधारित कालगणना पद्धत मानणाऱ्या राज्यात पाळला जातो. व सूर्योदरीत कालगणना पाळणाऱ्या आसाम केरळ ओरिसा तमिळनाडू पश्चिम बंगाल आदी राज्यात अधिक मास पाळल्या जात नाही .

अनुराधा अर्जुन गळेगावे (भुरे)
ता.मुदखेड.जि नांदेड.
(लेखिका,शिक्षिका,कवयित्री)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles