विचार करू या??

विचार करू या??पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आयुष्य जगण्याची धडपड
फक्त मिळवण्याची गडबड
काही निसटून गेल्याची चरफड
कधी फुकटचीच फडफड..

नुसतं धावतोय कशाच्यामागे
फक्त नि फक्त हव्यासापायी
मनाची ती असमाधानी वृत्ती
झाली आता प्रत्येकाच्या ठायी..

सोडून नातेसंबंध, मैत्री बरचंकाही
झाले सारे अधुनिकतेचे व्यसनी
खूपकाही गोष्टी राहून गेल्या पाठी
तांत्रिक उपकरणांची अपेक्षा उसनी..

विचार करू या? ना जरा गांभीर्याने
सहजसोप्या आयुष्यत नको बहाणे
एकच आयुष्य मिळते मुश्किलीने
उगीच कशाला नसते कुढत बसणे..

स्वतः जगताना मनमुराद हसावे
जबाबदारीच्या ओझ्याखाली
उगीच मना विरुद्ध का जगावे
का घालवायचे आयुष्य दबावाखाली?

चला आता सामूहिकपणे
थोडासा विचार करू या?
कृती करताना स्वतःतल्या
चुकांना आता सुधारूया..

प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड.
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles