गळफास

गळफास



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तू असा लळा लावला कि
मी सारे दुःख ही पचवून गेलो
तुझा फोटो घेवून उशाशी
कितीदा तसाच झोपून गेलो

तू दिसता समोर अचानक
मी बोलणे विसरून गेलो
माघारी वळली तू अन
माझे मी पन हरवून गेलो

तुझ्या पाठीवरच्या बटा
तुझे ते मटकावत चालणे
सदा राहते मनाच्या कुपित
तुझे ते खोडकर पाहणे

तू भेटत नाही हल्ली
तुला ओढ लागली कुणाची
उठते काहूर विचारांचे
चलबिचल होते मनाची

तुझ्या आठवणींचा गळफास
जीव हा होतो वर खाली
सदा तुझ्या वाटेकडेच डोळे
येणा सखे बघ सांजवेळ झाली

डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles