हिरकणी

हिरकणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रहर होता सांजेचा
रायगडाचे महाद्वार झाले बंद
हिरकणी ला उशीर झाला
सूर्य तेज ही झाले मंद..

उशीर होता धावत सुटली
आली महाद्वारा कडे हिरकणी
कितीतरी मग आर्जव केले
करू लागली शिपायांची मनधरणी…

शिपाईयांने ऐकले नाही काही
ते म्हणाले आता उद्याच जावा
आज रातच्याला इथेच रहावा
सकाळी लवकर गड उतरावा.

हिरकणीचे कंठ दाटले
डोळे अश्रूंनी भरले.
मन गड उतरु लागले
जीव बाळात गुंतले.

आता मनधरणी करू कुणाची
बाळा पाशी नेण्याची.
देवा आता तुच वाली
रक्षा कर माझा बाळाची.

विचार करता हिरकणी
गडावर फिरु लागली सैरावैरा
तितक्या तिला बुरुज दिसला
तिथे नव्हता शिपायांचा फेरा

हिरकणीने मग पराक्रम केला
बुरुज उतरू लागली.
कांटेकुटे,साप,विंचू ती
हाताने तुडवु लागली.

उतरताच गड घरा कडे धावली
हृदयाशी कवटाळले बाळाला
माऊलीची माया केवढी
घाबरली नाही बुरुजाला…

हिच हिरकणी प्रसिद्ध झाली
शिवबांच्या काळात
आज ही तिची आठवण देणारा
हिरकणी बुरूज किल्ले रायगडात.

मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles