आई

आईपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कसं आई तू एवढं रडूनही हसतेस
पोटासाठी रात अन् दिसभर खपतेस

जन्म देऊन तान्ह्याला, झोळीमधी ठेवतेस
एका दिवसाच्या ओलेत्याने मात्र उभा ऊस तोडतेस
नवरा कुठं पिऊन पडलाय, समजूनही विसरतेस
तू मात्र पोटासाठी, रात-दिस खपतेस…

आई तुझं जगणं म्हंजी, इस्तवाशी सोयरिक
पोटच्या लेकरांसाठी सोडतेस कधी कधी जनरित
पावलांचा माग तुझ्या चिखलातच रूतून जातो
डोळ्यातलं पाणी सुद्धा महापूर गिळून नेतो
अंगावरचं नेसूचही झिजेपर्यंत फाटत नाही
तुझं मात्र पोटासाठी राबणं कधी संपत नाही…

कवटाळतेस मला जेव्हा, शब्द पण फुटत नाही
बाळूतं ओलं असूनही, बदलायची फिकीर राहत नाही
खातेस काय? अन् जगतेस कशी? कोण तुला इचारतयं
लेकरांचं जगणं मात्र तुझ्यातमुळे फुलतयं
कशी ग तु इतकी अशी? काट्याकुट्यात जगतेस
आणि रात-दिस पोटासाठी सतत खपतेस….

संचित कांबळे , कोल्हापूर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles