मनकवडा

मनकवडापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुझ्या कडे पाहताच
एक प्रश्न पडतोय मला
ही कशी साधलीय तुला
मन वाचण्याची रे कला.. //

ध्वनीच्या कंपनातून ही
जाणतोस ह्रदय स्पंदन
मला लपवता येत नाही
ओठातील सुप्त स्फुंदन.. //

दिलखुलास हसणे असो
की आतल्या आत रडणे
माझ्याच भाव भावनांशी
तुझे हे बिनतारी जोडणे.. //

मला माझ्यापेक्षाही जास्त
खरे तर तूच ओळखतोस
मी स्वस्थ असे की अस्वस्थ
तू चेहर्‍यावरून पारखतोस.. //

कधी कधी मी विचारमग्न
आता काय बोलावे तुला
तू मनातलेच बोलून जातो
याचेच आश्चर्य वाटते मला.. //

तू इतका चतुर मनकवडा
एक सोडवशील का कोडे
तुला प्रिया म्हणू की मित्र
मला सांगशील का रे थोडे… //

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
======

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles