गृहिणी

गृहिणीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हाती पाळण्याची दोर
करी सुखाचा संसार
स्त्रीविना नाही रे घर
करा मनातुन स्विकार!

शर्थीने झुंजायचे फार
दुःख असले ओठांवर
घराची काळजी तत्पर
स्वभाव प्रेमळ जरूर !

जीवनाची रे जोडीदार
तिचाच घराला आधार
करी मुलांवर संस्कार
स्वच्छ असते घरदार !

हासरा चेहरा समोर
कधी घेई ती माघार
निर्णय घेते बरोबर
रंगरुप दिसते सुंदर !

करावा स्त्रीचा आदर
असे पुरुष समजदार
दोघांचा असतो संसार
आयुष्याचे जोडीदार!

बदलले जग खरोखर
स्त्रीचे आदर्श विचार
मानाचा मुजरा त्रिवार
जपते सुखी परिवार!

अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles