सूचनार्थ

सूचनार्थपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

येथे सूचना नियम
सारे पालन करूया
शिस्तबद्ध हे जीवन
असे सर्वांनी जगूया ||१||

काही सूचना असती
उपयोगी जीवनात
करूनिया हो वाचन
चला आणू अंमलात ||२||

दिलेल्या सूचनांकडे
नको दुर्लक्ष करूया
सूचनांच्या आधाराने
पुढे पाऊल टाकूया ||३||

चूक घडली कार्यात
नाही वाचली सूचना
वेळ निघूनिया जाता
होती मनास वेदना ||४||

सारे नियम वाचूया
साऱ्या चूका थांबवूया
चूका शोधण्याची संधी
नको कुणाला देऊया ||५||

विनवणी विजेत्यांना
फोटो तुमचा पाठवा
स्पर्धा निकाल वाचूनी
जागरूकता दाखवा ||६||

आहे सुंदर जीवन
सर्व सूचना वाचावे
सूचनार्थ नियमांचे
आम्ही पालन करावे ||७||

विनायक कृष्णराव पाटील, बेळगाव
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles