लोकशाहीर ‘फकीरा ‘

लोकशाहीर ‘फकीरा ‘पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लोकशाहीर ‘फकीरा’ …
तू एक धगधगता निखारा
विषमतेला देण्या मूठमाती
लेखणी घेतलीस हाती
पेटविण्या अंधारात वाती

लोकशाहीर ‘फकीरा’ …
जन्मशताब्दी वर्ष हे
करतोय तुला मुजरा
तरली नाही शेषनागाच्या
मस्तकावर ही धरा

सत्याची चाड मनात
मन रमले रानावनात
अन्यायाची कीड ती
मुळासकट उपटण्या
लेखणीनेच झोडपले

कटू असले जरी सत्य
पाळले नाहीस रे पथ्य
वास्तवाचे भान ठेवून
मुखवटे काढलेस ठेचून
रक्त खवळते रे वाचून

कथा,कादंबरी,नाटक
कथासंग्रह,प्रवासवर्णन
पोवाडे,गायलीस छक्कड
विपुल रे साहित्यसंपदा
लेखणी तळपली खूपदा

असूनही महाराष्ट्रभूषण
का देतात लोकं रे दूषणं
लोकशाहीर ‘फकिरा’ हा
साहित्यसम्राट मराठीचा
सिद्धांत रे खरा धरतीचा

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles