मन जपताना

मन जपताना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मन तुझे जपताना
विचार करतो सखोल
तुच माझा प्रेमकिनारा
हृदयी प्रेमाची ओल.

तुच माझी कविता
जपतो तुला जीवापाड
तुच माझे मीत‌ गं मला
करू नकोस नजरेआड.

नित्य जपेन अलवार
तुझ्या नाजूक भावना
निखळ प्रीत फुलवेन गं
नाहीच मनी दुजी वासना.

तुझ्या सुखात माझे सुख
तुझ्या दुःखात माझे दुःख
संवाद साधता तुझ्याशी
भागते माझी तहान भूक ‌‌.

झाली तुझी इतकी सवय
ओळखला मनीचा भाव
सखी म्हणू की प्रिया तुला
हृदयी कोरले तुझेच नाव.

भरवसा ठेव माझ्यावर
मी जाणार नाही वाया
होईन तुझ्या माथ्यावर
मी आभाळाची माया.

नजरेसमोर ठेवून तुला
हर आव्हान पेलेन लिलया
तूच माझी स्फूर्तीदेवता
तुझ्या प्रेरणेची किमया.

सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles