उनाड मन

उनाड मनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बंधमुक्त उनाड मन असं
कसं सैरभैर धावत सुटतं ,
नाकात वारे शिरल्यागत
इकडून तिकडं हुंडारतं…!

योग्य,अयोग्य जाण नसे
नाही ओझं जबाबदारीचं ,
मौजमज्जा करीत राही
भान न राहतं कर्तव्याचं…!

उनाड मन भटकत राही
थांगपत्ता न लगे कुणाला ,
काय करतोय काय नाही
कल्पना नसे याची याला…!

उनाड मन मोकाट फिरे
वायुवेगे सुसाट धाव घेई ,
करु पाहतयं वेगळं काही
त्याची तया वाटे नवलाई…!

उनाड मना आवराव कसं
काही केलं काबूत राहीना ,
गगनभरारी घेई क्षणार्धात
जमिनीवरती पाय रोविना…!

उनाड मन खोडकर भारी
करीत राही थट्टा मस्करी ,
आनंद देईल कधी कोणा
उठेल कुणाच्या जीवावरी…!

या फुलाहून त्या फुलावर
फुलपाखरागत उडत जाई ,
चंचल मन हे स्थिरता नसे
मधुगंध आस्वाद घेत राही…!

बी एस गायकवाड
पालम, परभणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles