“सुखाचा बॅलन्स भरणारा चेक.. तू”; स्वाती मराडे

“सुखाचा बॅलन्स भरणारा चेक.. तू”; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मनाच्या कुपीत जपून ठेवावी अशी प्रेमळ काळजी करणारी आजी.. तुझ्या गाणीगोष्टी ऐकायला, मायेच्या हाताचा स्पर्श अनुभवायला, तुझ्या आसपास लुडबुड करायला, आई-बाबांच्या रागापासून वाचवायला, अनुभवाचे बोल सांगायला.. हवीसच तू.
जग दाखवणारी.. ती म्हणजे ममतेची मूर्ती, मनगाभा-यातील देव, जिच्या रागातही दडलेली असते माया, देते सुखाची छाया.. जन्माआधीपासूनच जिच्याशी नाळ जुळलेली असते… मायेचा पदर धरत असतानाच शिस्तीचे बाळकडू मिळते, ज्ञानामृत पाजणारी तू आई.. हवीसच तू.

मनातलं तुझ्याजवळ हक्काने बोलता येतं ती बहीण.. मोठी असेल तर तुझ्या खोड्या करताना येणारी मजा, लहान असेल तर तिला जपताना, ‘दादा’ पण दाखवायला, निराश कधी झालोच तर मनाला जपायला.. आईचं बिंब अनुभवायला.. हवीसच तू.

अवघं घर चैतन्याने भारून टाकते, जणू अंधारातही चांदण्यांची उधळण करते, भकास वाटणा-या रणात आनंंदसरींची बरसात करते, भय वाटले तर हक्काने बिलगते.. मधुर बोलांनी हरपते भान, विधात्याने पदरात घातलेलं आनंदाचं दान.. सुखाचा बॅलन्स भरणारा चेक.. आणि पोटी जन्म घेऊनही जी आईची माया देणारी ती लेक.. हवीसच तू.

आजी, आई, बहीण, लेक या चार पिढ्यातील तिला ज्यानं अनुभवलं त्याचं जगणं सार्थक झालं..! खरंय जीवनात ती नसेल तर जगणंच नीरस होईल.. याशिवाय आत्या, पत्नी, मैत्रीण ही सगळी बाईपणाची रूपे अनुभवताना जगणं कसं सुसह्य होतं.
या सगळ्यात बापाच्या काळजाचा ठाव घेते ती लेक.. तिचा जन्म होताच जेव्हा तिला तो तळहातावर घेतो.. तेव्हापासूनच तो तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो.. जणू सांगत असतो मनाला.. अंतरीच्या भावकळा जाणून हे बापपण खरंखुरं जगायला तूच हवी. तो तिला जपत असतो. दुनियेच्या वाईट नजरेपासून, वाईट हेतूपासून, संकटापासून, दु:खापासून.. कधी कधी तिच्या काळजीने पोखरतं त्याचं मन.. ती सासरी जाताना मूक अश्रू ढाळतं त्याचं मन..सासर व माहेर दोन्ही घरे उजळून टाकणारी ती.‌.. पण’ती’ खरंच सुरक्षित आहे का या जगात..!

खरंच तिला जपायला हवं.. कधी कधी जन्माआधीपासूनच तिच्यावर टांगती तलवार असते. जीवनात कितीही तिचं महत्त्व अधोरेखित झाले असले तरी दुय्यमपणाची छाप अजूनही मिटलेली नाही. कदाचित हाच आशय व्यक्त करण्यासाठी आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र.. तळहातावर घेतलेल्या स्त्री अर्भकाचे.. ‘हवीसच तू’ हे शीर्षक घेऊन व्यक्त होण्यासाठी मिळालेली ही संधी.. ‘ती’चे महत्व, स्त्री विविधतेची रूपे, तिच्या असण्याने जीवनात आलेला आनंद, एवढेच नव्हे तर घर अंगण फुलवणारी ती, तिच्यामुळेच जन्म.. अशा अनेक आशय फुलवणा-या रचना वाचून पुन्हा एकदा शिलेदारांच्या समृद्ध लेखणीचा आस्वाद घेता आला. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐
आदरणीय राहुलदादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏.

सौ स्वाती मराडे
इंदापूर, जि पुणे
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/ कवयित्री/ लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles