शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांच्या सर्वोत्कृष्ट कविता

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : आठवतात ते दिवस☄*
*🍂शनिवार : १२ / अॉगस्ट/२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आठवतात ते दिवस*

मी सैनिक भारतमातेचा
सुपूत्र माझ्या धरणीमातेचा
लाडोबा माझ्या आईबाबांचा
सजना माझ्या सजणीचा…..

मी रक्षण करतो भूमातेचे
लढतो मातेसाठी सीमेवरी
कुटुंबास मी त्यागतो पण
खूप खूप प्रेम करतो सर्वांवरी….

मन मला पण आहे ना
कुटुंबाला आधार देतो
संकटसमयी देशाचा पाईक होतो
देशाच्या रक्षणार्थ उभा ठाकतो…..

सीमेवरच आम्ही सैनिक सारे
सणाउत्सवाला आनंदानं नाचतो
घरच्यांची आठवण काढतो
व्हिडिओवर मग संवाद साधतो….

तन मन अर्पिले भूमातेसाठी
लढणार या भारतदेशासाठी
वेळ आलीच लढताना तर
प्राणाची आहुती देणार या देशासाठी…..

आठवतात ते दिवस लहानपणीचे
आईबाबांचा लाडोबा मी होतो
आता जगतोय देशासाठी अभिमानाने
आता देश राक्षणासाठी सदा उभा राहतो…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*आठवतात ते दिवस*

मनाच्या कुपीत जपून ठेवले
ते बालपण स्वच्छंद..
कुपीत उघडता दरवळला
तो आठवांचा सुगंध…
शाळेचा तो पहिला दिवस
जुन्या पुस्तकांना नवीन गंध..
गणवेश ही मोठ्या बहिणीचा
तरी मनात होता आनंद…
शबनमच्या झोळ्यात
पुस्तकां सोबत जमा बरंच काही
काडीपेटीच्या रिकाम्या डब्या
रंगीत खडू, अन् मोरपिस ही
मधल्या सुट्टीत जेवायला
सरळ यायचो घरी
श्रावणच्या महिन्यात शाळेत
असायची मज्जा जाम
शाळेतल्या वडाला बांधायच्या दोऱ्या
अन् झोके घ्यायचो लांबच लांब
हळूहळू वेळ सरली
हातातल्या वाळूसम निसटली..
आता फक्त आठवतात ते दिवस
वय वाढत गेले अन् सगळेच बदलले
आता सोबत राहतील आठवणीच बस..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*आठवतात ते दिवस*

माईने माझ्या देवाकडे
केला होता म्हणे नवस
घाल लेकरु माझ्या पोटी
ओटी भरुन उजव कूस

भक्ती तिची त्याच्यावरती
करती पूजा मनोभावे
उपासतापास सदासर्वदा
नित्यनेमाने देवा भजावे

भक्ती तिची आली फळा
अवतरलो मी या भूवरी
मरणयातना झाल्या तिजला
आनंदाच्या उधाण लहरी

घडवलं मला सुसंकारात
तिच्याच पायी ही पुण्याई
आठवतात ते दिवस
सांगे मज माझी जिजाई.

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*आठवतात ते दिवस*

आठवतात ते दिवस म्हणुन शहरात रुळले नाही
भाकर सोडून पिज्जा बर्गर मला कळले नाही

उन वारा पाऊस तिथेच मी अनुभवले
म्हणुन माझे शरीर इथे उन्हाने जळले नाही

गावातील मोगऱ्याचा सुगंध काही ओर होता
म्हणुन इथल्या अत्तराला मी भाळले नाही

खातात ते यीप्पी मॅगी जशी वळवळ गेंडराची
घिन वाटते म्हणुन मी चळले नाही

पाय वळती जरी आधुनिकतेत जगाच्या
आठवतात ते दिवस म्हणुन माझे पाय वळले नाही

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*आठवतात ते दिवस*

आठवतात ते दिवस
झाले होते कारगिल युद्ध
शाळेत होतो आम्ही तेव्हा
थोडेच कळत होते सिद्ध..

बेभान होऊन सैनिक
रातदिन लढत होते..
कारगिल च्या बर्फावर
लाल रंग दिसत होते..

खाण्याचीही त्यांना
नव्हती त्यांना भ्रांत..
शत्रुंना पळून लावायचे
जिंकायचे आपले प्रांत..

कारगिल ला सैनिक
अडुन बसले होते..
आम्ही वर्गणी गोळा
करुन पाठवले होते..

आठवतात ते दिवस
किती होते धोक्याचे..
लहान असुन आम्हीही
मदत पाठवली पैशाचे..

वर्गात बसुनही लक्ष
फक्त कारगीलकडेच..
पळवुन लावोत शत्रुना
मागणेही देवाला एवढेच..

*प्रतिभा गौपाले*
*नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*आठवतात ते दिवस*

“आठवतात ते दिवस
माझ्या त्या बालपणाचे ”
“होते त्यावेळी एकत्र कुटुंब
घर भरलेले अबाल वृद्धाचे ”

“नव्हता कधीच स्वार्थपणा
ऐकत होते लोक मोठ्यांचे ”
“मिळत होता मोठा आधार,
पाहत नव्हते फायद्या तोट्याचे ”

“पुरुष लोक होते कष्टाळू,
वृद्ध अत्यंत प्रेमळ मायाळू ”
“स्त्रियांचा डोईवर होता पदर,
आत्या,मावशी,आजी कनवाळू ”
“आई गात होती गाणी,ओव्या
धान्य जात्यावर दळत दळत”
“लहान आम्ही भाऊ, बहीण
ऐकत होतो अंगाई झोपत झोपत ”

“आठवतात ते दिवस अजूनही
बालपणीचे, गरिबीचे, हालाकीचे ”
“झेंडा वंदन आल्यावर कपडे
नव नवीन असायचे कधी नसायचे ”

*✍️ श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी,ता :सांगोला,जि :सोलापूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*आठवतात ते दिवस*

आठवतात ते दिवस
बालपणीच्या मजेचे
सख्यांच्या सहवासात
सोबतीने जगण्याचे

रानी-वनी मुक्तपणे
स्वैरपणे संचारण्याचे
सख्यांच्या सोबतीने
झुल्यावर झुलण्याचे

अवखळ, अल्लड
वाऱ्यासवे पळण्याचे
तरूवरील पक्ष्यांसंगे
सुस्वर गाणी गाण्याचे

रानमेव्याचा भरपूर
आस्वाद चाखण्याचे
पाने, फुले,वेलीसंगे
गुजगोष्टी करण्याचे

भातुकलीच्या खेळात
मनसोक्त खेळण्याचे
वाटे फिरूनी यावा काळ
बालपणीत रमण्याचे

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles